Health Tips: जीवनात ‘हे’ बदल केलेत तर मिळेल मानसिक तणावापासून मुक्ती

सुरूवातीला तणावाचे स्वरूप छोटेसे असते. परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने तो वाढत जातो.
Health Tips
Health TipsDainik Gomantak
Published on
Updated on

कित्येक जण तणावाच्या आहारी जावून व्यसनाच्या आहारी जातात. आपल्या संबंध-संपर्कातील व्यक्तींवर अकारण क्रोध करतात. त्यामुळे आज बऱ्याच ठिकाणी घराघरात दु:ख, अशांतीचे वातावरण दिसून येते. म्हणुनच कुठल्याही परिस्थितीत मनात दिर्घकाळ तणाव राहता कामा नये. वास्तविक सुरूवातीला तणावाचे स्वरूप छोटेसे असते. परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने तो वाढत जातो.

तणावाची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत –

⦁ डोके दुखणे, शरीर थरथरणे.

⦁ कुठल्याही कामात मन न लागणे आणि निराश राहणे.

⦁ कमी झोपणे किंवा अती झोपणे.

⦁ कमी जेवणे किंवा अती जेवणे.

⦁ कोणत्याही गोष्टीवर लक्ष न देणे.

⦁ इतरांपेक्षा स्वत:ला कमी समजणे.

⦁ नकारात्मक विचार येणे.

⦁ स्वत:ला बिनकामाचा समजणे.

⦁ मृत्यू किंवा आत्महत्येचा विचार येणे.

⦁ राग येणे आणि कमी बोलणे.

वरील सर्व ही तणावाची लक्षणे आहेत. ही लक्षणे वेळीच ओळखल्यास त्यावर त्वरित उपाय करता येऊ शकतो आणि तणावापासून मुक्ती मिळू शकते.

असे काही उपाय आहेत ज्या द्वारा तुम्ही ताणतणावापासून दूर राहू शकता

वेळेचे नियोजन -

आपल्याला दिवसभरात जी कामे करावयाची आहेत, ती लक्षात घेवून वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. ते जर करता आले नाही तर तणाव उत्पन्न होतो. त्यासाठी सर्वप्रथम दिवसभराच्या कामांची एक यादी बनवा. कामांचा क्रम निश्चित करा. त्यानंतर जे कार्य महत्वाचेआहे त्याला प्राधान्य द्या. एखादे काम कठीण वाटते म्हणून लांबणीवर टाकु नका. एखादे काम खुपच कठीण असेल, आपल्या आवाक्याबाहेरचे असेल तर त्यासाठी दुसऱ्यांची मदत घ्या. परंतु ते काम अवश्य पुर्ण करा.

Health Tips
Year ender 2022: थर्टी फर्स्टला पार्टी हार्ड, पण खाण्यावरही ठेवा नियंत्रण

जीवनशैलीमध्ये बदल-

आपल्या जीवनशैलीत परिवर्तन आवश्यक आहे. एकाच प्रकारची जीवनशैली असेल तर जीवनात नवीनता वाटत नाही. आपल्या कार्य करणाऱ्या पध्दतीत उमंग-उत्साह, स्फुर्ती, आनंद, नवीनता हवी. तरच आपण तणावापासून दूर राहू. म्हणुनच आपल्या दिनचर्येतील प्रत्येक कर्म वेळेवर करणे गरजेचे असते. उदा. वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, भोजन वेळेवर करणे.

सकस आहार-

पोषक तत्वांनी युक्त आहार घेतल्याने शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत मिळते. शरीर निरोगी असेल तर काम करताना उत्साह निर्माण होतो. शरीर जर कमजोर असेल मनाला मरगळ येते. परिणामी काम करण्याचे कौशल्य असूनही आपल्या हातून ते काम होत नाही. त्यामुळे सशक्त आणि निरोगी शरीरासाठी सकस आहाराचा समावेश असणं गरजेचं आहे.

Health Tips
Ayurvedic Medicine: थंडीच्या दिवसातील सर्दी-खोकल्याची समस्या करा दूर, 'हे' आहेत रामबाण उपाय

मन करा रे प्रसन्न -

चुकीच्या वा व्यर्थ शब्दांनी जसा तणाव उत्पन्न होतो. तसाच चांगल्या आणि मृदू शब्दांनी तणाव नाहीसा देखील होतो. मनोरंजन अथवा मनाची खुशी अत्यावश्यक आहे. असे म्हटले जाते की, मन खुश तो जहान खुश’. जीवनात जसे, योग्य आहार, विहार व निद्रा यांना महत्व आहे तसेच मनाच्या खुशीचे देखील महत्व आहे. त्यामुळे मनाला खुशी प्राप्त व्हावी यासाठी चांगल्या प्रतीचे संगीत ऐका, निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा, एखादा छंद जोपासा, आपल्या आवडीची समाज सेवा करा, ईश्वरीय ज्ञानाचे मनन चिंतन करा, सर्वांशी प्रेमपुर्वक व्यवहार करा, सर्वांविषयी मनात शुभभावना व शुभकामना ठेवा, मनाला दु:ख देणारे कोणतेही कार्य करू नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com