Horoscope 26 April 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी ठरणार वरदान; सूर्यदेव होणार प्रसन्न, बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

Horoscope 26 April 2026: आज वैशाख शुक्ल पक्षातील दशमी तिथी असून रविवारचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे

Sameer Amunekar

आज वैशाख शुक्ल पक्षातील दशमी तिथी असून रविवारचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण आज रात्री उशिरापर्यंत 'वृद्धि योग' आणि 'मघा नक्षत्र' यांचा शुभ संयोग जुळून येत आहे. या ग्रहांच्या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात आज भाग्योदयाचे संकेत मिळत आहेत. विशेषतः करिअर, आर्थिक लाभ आणि कौटुंबिक सुखाच्या बाबतीत आजचा दिवस प्रगतीकारक ठरणार आहे.

निश्चय आणि परिश्रमातून यशाची वाटचाल

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी मिळू शकते.

त्याचप्रमाणे वृषभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागला तरी, राजकीय किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या भेटीमुळे भविष्यात मोठे फायदे होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी सरकारी कामांमधील अडथळे दूर होऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील.

आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक सौख्य

कर्क राशीच्या व्यक्तींनी आज खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असले तरी, अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने घरातील जुने वाद संपुष्टात येतील. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष उपलब्धी घेऊन येईल, मात्र त्यांनी आपल्या स्वभावात लवचिकता ठेवणे गरजेचे आहे.

कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेत यशाचे योग असून वैवाहिक जीवन सुखाचे राहील. तुळ राशीच्या व्यक्तींनी इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळावे, अन्यथा मानहानी होऊ शकते.

करिअरमध्ये नवीन संधींची दस्तके

वृश्चिक राशीच्या तरुणांना करिअरशी संबंधित शुभ वार्ता मिळतील. तर धनु राशीच्या व्यावसायिकांना, विशेषतः वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठे ऑर्डर्स मिळण्याची दाट शक्यता आहे.

मकर राशीच्या जातकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील आणि नातेसंबंधांतील दुरावा कमी होईल. कुंभ राशीच्या लोकांसाठी नशीब पूर्णपणे अनुकूल असून त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. शेवटी, मीन राशीच्या व्यक्तींना उधार दिलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक बाजू भक्कम होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT