Goa Fishing Industry: मच्छीमारी व्यवसाय संकटात! परप्रांतीय ट्रॉलर्सचा धुडगूस सुरूच; कारवाईत हवे सातत्‍य

Goa Fishing Industry Crisis: हरमल, मांद्रे व परिसरातील किनारी भागात परराज्यांतील ट्रॉलर्स धुडगूस घालत असल्‍यामुळे स्थानिक मच्छीमार बांधवांचा व्यवसाय संकटात सापडला आहे.
Goa Fishing Industry
Goa Fishing IndustryDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: हरमल, मांद्रे व परिसरातील किनारी भागात परराज्यांतील ट्रॉलर्स धुडगूस घालत असल्‍यामुळे स्थानिक मच्छीमार बांधवांचा व्यवसाय संकटात सापडला आहे.

बुधवारी बाणावली येथे कारवाई करून १३ परप्रांतीय ट्रॉलर्स ताब्‍यात घेण्‍यात आल्‍यामुळे स्‍थानिक मच्‍छीमारांनी समाधान व्‍यक्त केले आहे. मात्र ही कारवाई पुढे अशीच सुरू ठेवावी, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

Goa Fishing Industry
Goa Malaria Cases: मलेरियावर यशस्वी मात! गेल्या 9 वर्षात एकाचाही मृत्यू नाही, दरमहा सरासरी 93 रुग्ण तरीही नियंत्रण कायम!

परप्रांतीय ट्रॉलर्समुळे स्‍थानिकांचा मच्‍छीमारी व्‍यवसाय नुकसानीत गेला आहे. खात्याचे धोरण कुचकामी ठरत असल्याचा आरोप करत किनारी पोलिसांच्या अपुऱ्या कारवाईबद्दल त्‍यांनी संताप व्यक्त केला आहे.

Goa Fishing Industry
Goa Illegal Fishing: पकडलेल्या 13 ट्रॉलर्सपैकी 4 पसार, पोलिसांत तक्रार; मालकांवर दंडात्मक कारवाईची तयारी

गोव्‍याच्‍या सागरी हद्दीत बेकायदेशीर प्रवेश करून मोठ-मोठे ट्रॉलर्स समुद्रातील मासळीची अक्षरश: लूट करत आहेत. त्‍यासाठी ते बंदी असलेल्‍या एलईडी लाईटचा आधार घेत आहेत. परिणामी स्थानिक मच्छीमारांना रिकाम्या हाताने परतावे लागते. याबाबत माहिती दिल्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत ट्रॉलर्स हद्दीबाहेर गेलेले असतात. त्यामुळे कारवाई होत नाही, असे व्यावसायिक साक्रु डिमेलो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com