20 February 2026 Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: शुक्रवारी लक्ष्मी प्रसन्न! 'या' 3 राशींच्या नशिबात अचानक धनलाभाचे योग; वाचा आजचे राशीभविष्य

20 February 2026 Horoscope: आज फाल्गुन शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून शुक्रवारचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्रवार हा धनलक्ष्मीचा वार मानला जातो.

गोमंतक ऑनलाईन टीम

आज फाल्गुन शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून शुक्रवारचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्रवार हा धनलक्ष्मीचा वार मानला जातो. आज साध्य योगासोबतच उत्तरा भाद्रपद नक्षत्राचा विशेष प्रभाव राहणार आहे. जरी आज पंचक आणि भद्रा असली, तरी काही विशिष्ट राशींसाठी आजचा दिवस भाग्योदयाचा ठरणार आहे. विशेषतः तीन राशींच्या जातकांना आज नशिबाची भक्कम साथ मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मेष ते कर्क: प्रगती आणि आनंदाचे संकेत

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असेल. दुपारपर्यंत एखादी गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल. वृष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस परिवर्तनाचा आहे.

जुन्या विचारांच्या बेड्या तोडून तुम्ही प्रगतीकडे वाटचाल कराल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींना राजकारणात मान-सन्मान मिळेल, तर कर्क राशीच्या अविवाहित लोकांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याचे संकेत आहेत.

सिंह ते वृश्चिक: करिअर आणि व्यवसायात वृद्धी

सिंह राशीच्या लोकांसाठी आज नवीन कल्पना फायदेशीर ठरतील, विशेषतः मातीच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना मोठा लाभ होईल. कन्या राशीच्या जातकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल; ऑफिसमधील प्रलंबित कामे मार्गी लागतील आणि लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होईल. तुला राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्यावी, मात्र कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी सरस राहील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस 'लकी' ठरेल, जोडीदाराची साथ तुम्हाला प्रत्येक कामात उभारी देईल.

धनु ते मीन: कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक स्थैर्य

धनु राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे, स्पर्धा परीक्षेत उत्तम निकाल मिळतील. मकर राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, व्यावसायिक सल्लामसलत फायदेशीर ठरेल.

कुंभ राशीच्या मालमत्ता धारकांसाठी आजचा दिवस मोठा आर्थिक लाभ घेऊन येईल. शेवटी, मीन राशीच्या जातकांसाठी करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

River Pollution: साळ नदीच्या प्रदूषणाला बेकायदेशीर घरे कारणीभूत? सरपंच डिक्सन वाझ यांचा आरोप

SCROLL FOR NEXT