Goa vs Kerala Women's Cricket
Goa vs Kerala Women's CricketDainik Gomantak

Goa vs Kerala Women's Cricket: शतकी सलामीनंतरही गोवा पराभूत, सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेत केरळचा मोठा विजय

Senior Women's One Day Trophy 2026: सीनियर महिला एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात शतकी सलामीनंतरही गोव्याचा डाव १८० धावांत गुंडाळला गेला.
Published on

पणजी: सीनियर महिला एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात शतकी सलामीनंतरही गोव्याचा डाव १८० धावांत गुंडाळला गेला. त्यामुळे केरळने सामना १०२ धावांनी सहजपणे जिंकला. रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी सामना झाला.

गोव्याचा हा स्पर्धेतील सलग चौथा, तर एकंदरीत पाचवा पराभव ठरला. सात सामन्यांतून त्यांचे दोन विजयांमुळे आठ गुण कायम राहिले. सात संघाच्या गटात त्यांना सहावा क्रमांक मिळाला. केरळने पाचव्या विजयाची नोंद केली. २० गुणांसह त्यांना तिसरा क्रमांक मिळाला.

गोव्यासमोर विजयासाठी २८३ धावांचे आव्हान होते. पूर्वजा वेर्लेकर (५९, ७६ चेंडू, ६ चौकार, १ षटकार) व हर्षिता यादव (६६, ६६ चेंडू, ९ चौकार, १ षटकार) यांनी वीस षटकांत ११३ धावांची सलामी दिली. विसाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर एस. आशा हिने हर्षिता हिला त्रिफळाचीत बाद केल्यानंतर गोव्याचा डाव १८० धावांत संपुष्टात आला.

Goa vs Kerala Women's Cricket
Goa Shigmotsav: शिमगोत्सव मेळांना 300 कोटींचे अर्थसाह्य देणार! मंत्री रमेश तवडकर यांची माहिती

आशा (३-१९) व टी. शानी (४-२८) गोव्याच्या बॅटरनी सपशेल लोटांगण घातले. त्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना केरळने आक्रमक फलंदाजी केली. त्यांच्या ए. अक्षया (६४, ७८ चेंडू, ९ चौकार) व एस. आशा (७१, ५६ चेंडू, ८ चौकार, १ षटकार) यांच्यामुळे केरळने ४२ षटकांत अडीचशे धावांचा टप्पा गाठला होता, मात्र तेजस्विनी दुर्गड हिच्या पाच विकेटमुळे केरळचा डाव २८२ धावांत आटोपला.

Goa vs Kerala Women's Cricket
OLA CEO Goa Case: ‘ओला’चे सीईओ भाविश अग्रवालना दिलासा! गोवा खंडपीठाक़डून ‘वॉरंट’ला स्थगिती; पुढील सुनावणी 6 मार्च रोजी

संक्षिप्त धावफलक

केरळ ः ४७.५ षटकांत सर्वबाद २८२ (टी. शानी २९, ए. अक्षया ६४, आय. व्ही. दृष्या ३८, एस. आशा ७१, सीएमसी नज्ला २७, मेताली गवंडर ५-०-२८-०, हर्षिता यादव ४-०-१८-०, तनया नाईक ३-०-२७-०, तेजस्विनी दुर्गड ९-१-४८-५, पूजा कलेल ४-०-३२-१, पूर्वा भाईडकर ८.५-०-३७-१, विधी भांडारे ८-०-५५-२, श्रेया परब ६-०-३३-१) वि. वि. गोवा ः ४५.३ षटकांत सर्वबाद १८० (पूर्वजा वेर्लेकर ५९, हर्षिता यादव ६६, तेजस्विनी दुर्गड ७, दीक्षा आमोणकर ४, पूर्वा भाईडकर २, तनया नाईक नाबाद २२, विनवी गुरव २, श्रेया परब ४, मेताली गवंडर ४, विधी भांडारे १, पूजा कलेल २, एस. आशा १०-२-१९-३, टी. शानी १०-०-२८-४).

पूर्वजा वेर्लेकरची फलंदाजीत छाप

गोव्याच्या पूर्वजा वेर्लेकर हिच्या ७ डावांत १ शतक व ३ अर्धशतकांसह ७४.३३च्या सरासरीने ४४६ धावा

सीनियर महिला एलिट विभागात पूर्वजा हिला फलंदाजीत पाचवा क्रमांक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com