Mauvin Godinho  Dainik Gomantak
गोवा

Goa News: झेडपी सदस्‍यांना लवकरच मोठी जबाबदारी! पंचायतमंत्री गुदिन्‍होंनी दिली माहिती; पणजीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Mauvin Godinho: जिल्‍हा पंचायत सदस्‍यांना आपापल्‍या मतदारसंघांचा विकास साधण्‍यासाठी विविध प्रकारचे अधिकार देण्‍यात येणार असल्‍याची घोषणा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काहीच दिवसांपूर्वी केलेली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: नवनिर्वाचित जिल्‍हा पंचायत सदस्‍यांना आपापल्‍या मतदारसंघांचा विकास साधण्‍यासाठी विविध प्रकारचे अधिकार देण्‍यात येणार असल्‍याची घोषणा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काहीच दिवसांपूर्वी केलेली होती. त्‍यानंतर आता सामाजिक विकासाला अधिकाधिक गती देण्‍यासाठी जिल्हा पंचायत सदस्‍यांच्‍या खांद्यावर पुढील काळात काही जबाबदाऱ्या देण्‍यात येणार असून, लवकरच त्‍याबाबतची घोषणा केली जाईल, असे पंचायतमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी गुरुवारी स्‍पष्‍ट केले.

नवनिर्वाचित जिल्‍हा पंचायत सदस्‍यांसाठी ‘जीपार्ड’तर्फे पणजीत आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या समारंभावेळी ते बोलत होते. पंचायत संचालक महादेव आरोंदेकर, जीपार्डचे संचालक वासुदेव शेट्ये आदी यावेळी उपस्‍थित होते. जिल्‍हा पंचायत सदस्‍यांनी आपापल्‍या मतदारसंघांचा विविध क्षेत्रांत विकास घडवून आणून राज्‍याचा सर्वांगीण विकास साधण्‍यात योगदान देणे आवश्‍‍यक आहे.

कोणताही भेदभाव न करता त्‍यांनी विकासाची गंगा समाजातील शेवटच्‍या माणसापर्यंत पोहोचवली पाहिजे. यासाठीचे प्रशिक्षण देण्‍यासाठीच ‘जीपार्ड’ने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असून, त्‍याचा फायदा सर्वच सदस्‍यांना होईल. या शिबिरामुळे आपल्‍या जबाबदाऱ्या आणि कर्तव्‍यांची माहिती त्‍यांना मिळेल, असा विश्‍‍वास मंत्री गुदिन्‍हो यांनी व्‍यक्त केला.

निधी विनावापर पडू देऊ नका!

जिल्‍हा पंचायत मतदारसंघांच्‍या विकासासाठी केंद्र, राज्‍य सरकारसह वित्त आयोगाकडूनही निधी देण्‍यात येतो. परंतु, त्‍या निधीतील पैसा विनावापर पडून असल्‍याचे वारंवार दिसून येत आहे. त्‍यामुळे जिल्‍हा पंचायत सदस्‍यांनी आपापल्‍या मतदारसंघांतील जनतेसाठी आवश्‍‍यक असलेले प्रकल्‍प, साधनसुविधा उभारून हा निधी खर्च करावा, असे आवाहनही मंत्री माविन गुदिन्‍हो यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT