ना अटल, ना चंद्रपूर तिसऱ्या जिल्ह्याचे नाव 'कुशावती', CM प्रमोद सावंतांनी सांगितले महत्व आणि इतिहास; ZP चे गणितही केले स्पष्ट

Goa Third District Name: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याची अधिकृत घोषणा केली असून, या नवीन जिल्ह्याचे नाव 'कुशावती' असे असेल
Kushavati District
Kushavati DistrictDainik Gomantak
Published on
Updated on

बातमीबाबत थोडक्यात माहिती (News Synopsis)

१) गोव्यात गेल्या अनेक दिवसांपासून नवीन तिसरा जिल्हा निर्माण करण्याच्या हालचालींना वेग आला होता. याबाबत अखेर बुधवारी अधिकृत घोषणा करण्यात आली.

२) धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण या चार तालुक्यांचा समावेश असलेल्या तिसऱ्या जिल्ह्याचे 'कुशावती' असे नामकरण करण्यात आले आहे.

३) नव्या तिसऱ्या जिल्ह्यासाठी नव्या जिल्हा पंचयातीची देखील स्थापना केली जणार असून, यासाठी काही अवधी लागेल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याची अधिकृत घोषणा केली असून, या नवीन जिल्ह्याचे नाव 'कुशावती' असे असेल. उत्तर आणि दक्षिण गोव्यानंतर आता 'कुशावती'च्या रूपाने राज्याला तिसरा प्रशासकीय विभाग मिळाल्यामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रशासकीय कामांना मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्वतंत्र जिल्हा पंचायत आणि तिसरा 'अध्यक्ष'

तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीसोबतच गोव्याला आता एक नवीन जिल्हा पंचायत देखील मिळणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रक्रियेत लवकरच 'कुशावती' जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नियुक्ती केली जाईल. यामुळे राज्याच्या जिल्हा पंचायत राजकारणात आणि नियोजनात आता तिसरा महत्त्वाचा स्तंभ उभा राहणार आहे.

Kushavati District
Goa Third District: तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती! गोवा सरकारला घ्यावा लागणार 4 महिन्यात निर्णय; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढले दडपण

'भिवपाची गरज ना' - मुख्यमंत्री

नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे प्रशासकीय कामकाजात कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वस्त केले आहे. "लोकांक भिवपाची गरज ना ," असे म्हणत त्यांनी स्पष्ट केले की, ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाईल.

जोपर्यंत नवीन जिल्हाधिकारी आणि इतर कार्यालये पूर्णपणे कार्यान्वित होत नाहीत, तोपर्यंत सर्व जबाबदारी सध्याच्या दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडेच राहील. प्रशासकीय सीमांकन आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दळणवळणात सुधारणा: केपे-काणकोण बस सेवा

जिल्हा निर्मितीच्या घोषणेसोबतच मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रवाशांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी दिली आहे. केपे ते काणकोण घाट या भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच नवीन बस सेवा सुरू केली जाईल. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सुकर होईल.

'कुशावती' जिल्ह्याच्या सीमा नक्की कोणत्या असतील आणि कोणत्या तालुक्यांचा यामध्ये समावेश होईल, याबाबतची सविस्तर माहिती आगामी काही दिवसांत अधिकृत अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाईल.

Kushavati District
Goa Nightclub Fire Case: 'काचेचे ग्लास, पाण्याच्या बाटल्यांनी क्लबचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवत होते'; दिल्लीच्या जोशींना कोर्टाबाहेर रडू कोसळले

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Question (FAQ))

प्रश्न: गोव्यात नव्याने निर्माण झालेल्या तिसऱ्या जिल्ह्याचे नाव काय?

उत्तर: गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, त्याचे कुशावती असे नामकरण करण्यात आले आहे.

प्रश्न: गोव्यातील नवीन जिल्ह्याला कुशावती नाव का देण्यात आले?

प्रश्न: कुशावती गोवा राज्यातील एक प्राचीन नदी असून, ती नव्या जिल्ह्यात समाविष्ट असलेल्या चारही तालुक्यातून वाहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com