पणजी : तबला उस्ताद झाकिर हुसेन यांचे अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे उपचारादरम्यान निधन झाले. झाकिर हुसेन यांच्या निधनाने संगीतविश्वात पोकळी निर्माण झाली असून तबला वादनाने जगभरातील संगीतप्रेमींच्या मनात स्थान मिळवणाऱ्या 'उस्ताद' झाकीर यांचं गोव्यावर विशेष प्रेम होते. संगीत महोत्सवानिमित्त 'उस्ताद' अनेकदा गोव्यात येवून गेले आणि याच गोव्यातील वाद्यदुरुस्ती करणाऱ्या दयानंद परब यांच्याकडील 'तबला' भेट म्हणून देण्याता आला आणि विश्वविख्यात उस्तादाच्या तोंडून 'वाह!' असे स्वर उमटले.
गोवा ही मुळातच कलाकारांची भूमी आहे, इथे कलेचा आदर आणि सन्मान केला जातो. सध्या गोव्यात सुरु असलेलं सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हल याचंच एक उदाहरण म्हणावं लागेल. योगायोग सुद्धा फारच विलक्षण असतो तो असा, गेल्यावर्षी जिथे याच कार्यक्रमाला स्वतः झाकीर हुसेन उपस्थित होते यंदा त्याच कार्यक्रमाच्यावेळी उस्तादजी आपल्यात नाहीयेत, पण उस्तादजी काळाच्या पडद्यामागे गेले असले तरीही त्यांच्या आठवणी कधीच न पुसणाऱ्या आहेत.
बार्देस तालुक्यात दयानंद परब राहतात. दयानंद यांचा पिढीजात वाद्यदुरुस्तीचा व्यवसाय आहे. गोवा आणि महाराष्ट्रातील तबला वादक हे वाद्यदुरूस्तीसाठी परब यांच्याकडे येतात. दयानंद परब हे सुरूवातीला खाणकाम क्षेत्रात कामाला होता. त्यांचे आजोबा आणि वडील यांचा वाद्यदुरूस्तीचा व्यवसाय होता. या व्यवसायात परब यांना कधीच रस नव्हता. सुट्टीच्या दिवशी ते वडिलांना वाद्यदुरूस्तीसाठी मदत करायचे. जवळपास ८० वर्षांपासून परब कुटुंबीय वाद्यदुरुस्ती करतात. वाद्यदुरूस्ती करणारे हे वादक नसले तरी त्यांना संगीत, स्वर याची उत्तम जाण असते. यामुळेच
खाणकाम क्षेत्रातील नोकरी सोडल्यानंतर दयानंद हे वाद्यदुरूस्तीचं काम करू लागले. पिढीजात व्यवसाय असल्याने ग्राहक आधीपासूनच जोडलेले होते. हाच वारसा दयानंद यांनी पुढे नेण्याचे ठरवले.
गोव्यातील माशेल येथील एक प्रख्यात कलाकार तुळशीदास नावेलकर यांनी दयानंदकडून एक तबला बनवून घेतला होता. हा तबला झाकीर हुसेन यांना भेट म्हणून दिला जाणार होता. आपण बनवलेला तबला हा उस्तादजींना भेट केला जाणार ही कल्पनाच दयानंद यांच्यासाठी अविश्वसनीय अशी होती.
ती आठवण दयानंद यांच्यासाठी नेहमीच खास असेल. उस्तादजी हे खरोखर हाडाचे कलाकार होते आणि त्यांना गोव्यात आजतागायत जपल्या गेलेल्या पारंपरिक संगीताबद्दल आनंद वाटायचा असं दयानंद परब यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.