Pramod Yadav
गोव्यात सध्या कलाविष्कारने नटलेल्या वैविध्यपूर्ण सेरेंडिपिटीची आर्ट फेस्टिव्हलची धामधूम सुरु आहे.
सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हल गोवेकरांसह देश-विदेशातील कलाप्रेमींसाठी खास पर्वणी असते.
संगीत, नृत्य, गायन, वादन याचे लाईव्ह सादरीकरण पाहण्याची संधी नागरिकांना मिळते.
गोव्यात 15 ते 23 डिसेंबर या कालावधीत सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हल कलाप्रेमींसाठी खास पर्वणी असते, यात विविध कलाविष्कार पाहण्याची संधी उपलब्ध होते.
वैविध्यपूर्ण कलाप्रकार आ्णि देशभरातील कलाकार या फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावत असतात.
आठ दिवसांच्या या विविध कलांनी ओतप्रोत भरलेल्या महोत्सवात गोव्यातील वातावरण उत्साहपूर्ण असते.
यात मांडवीत बोटीतून संगीतमय यात्रेची अनुभूती देखील घेता येते.