MLA Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao : कुंकळ्ळीतील प्रदूषणकारी प्रकल्पांविरोधात युरी आलेमाव यांचा एल्गार

गोवा राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाला पत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Yuri Alemao : विरोधी पक्षनेते आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदुषणकारी उद्योगांविरूद्ध एल्गार पुकारला आहे. त्यांनी गोवा राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाला पत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाची उच्च पातळी हा स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यासाठी मोठा धोका आहे. वारंवार तक्रारी केल्यानंतर तसेच वर्तमानपत्रे आणि समाजमाध्यमांवर प्रदूषण दाखवणाऱ्या बातम्या छापून आल्यानंतरही औद्योगिक वसाहतीतील आस्थापनांकडून होणाऱ्या जल आणि वायू प्रदूषणाकडे सरकारी प्राधिकरणांनी डोळेझाक केली आहे. प्रदूषक आस्थापनांना त्यांचे कारखाने चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे असे युरी आलेमाव यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान आपण केलेल्या लेखी तक्रारीची गंभीर दखल घेतली जाईल आणि सर्व प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई केली जाईल अशी आशा युरी आलेमाव यांनी व्यक्त केली आहे. आता निर्वाणीचा इशारा दिल्यानंतरही जर सरकार कारवाई करणार नसेल तर लोकांना रस्त्यावर येणे भाग पडेल जेणेकरुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा विरोधी पक्षनेते आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी दिला आहे.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखाने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर प्राधिकरणांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाहीत. त्यामुळे जल आणि वायू प्रदुषणाचे प्रमाण वाढले आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत पर्यावरणीय मंजुरी तसेच कंसेट टू ऑपरेट परवान्याशिवाय अनेक कारखाने चालू आहेत, असा आरोपही युरी आलेमाव यांनी केला आहे.

युरी आलेमाव यांनी लिहिलेल्या पत्रात ऑरेंज फॉक्स स्टील प्रा. लि. हा कारखाना पर्यावरणीय मंजुरीशिवाय कार्यरत असल्याचे सांगून त्यामुळे राज्याच्या तिजोरीचे नुकसान होत असल्याचे नमूद केले आहे. सदर औद्योगिक वसाहतीत सरकारने मंजुरी दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन करून फायदा जोडण्याचे प्रकार सर्रास चालत आहेत. सदर बेकायदेशीरपणामुळे सरकारी तिजोरीला काहीच फायदा होत नसल्याचे युरी आलेमाव यांनी त्यांच्या पत्रात निदर्शनास आणून दिलं आहे.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील विविध फिश मिलमुळे होणाऱ्या प्रदूषणावरही युरी आलेमाव यांनी आपल्या पत्रातून प्रकाश टाकला आहे. मत्स्य गिरण्यांद्वारे उघड्यावर सोडण्यात येणाऱ्या घाण पाण्यामुळे लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. काही फिश मिल्स बोअरवेलमध्ये सांडपाणी टाकतात ज्यामुळे शेवटी भूजल प्रदूषित होते, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

पत्रात अधोरेखित केलेल्या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेऊन प्रदूषण थांबवण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत आणि प्रदूषणास कारणीभूत असलेल्या औद्योगिक कारखान्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युरी आलेमाव यांनी पत्राद्वारे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींगच्या निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

SCROLL FOR NEXT