Calangute: कळंगुट पंचायतीने उगारला कारवाईचा बडगा; दोन डान्सबार सील

कळंगुट पंचायतीने घेतला डान्सबारवर बंदीचा निर्णय घेतला
Calangute
CalanguteDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

गोवा सरकारने पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी व्यावसायिकांना अवैधकृत्यांना आळा घालता यावा या उद्देशाने काही नियम लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर कळंगुट ग्रामपंचायतीने 4 डिसेंबर रोजी वाढत असलेल्या बेकायदा कृत्यांवर आळा म्हणून डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर पंचायतीने काल रात्री उशिरा दोन डान्सबार कारवाईचा बडगा उगारला आहे.

(Calangute panchayat has sealed two dance bar)

Calangute
Goa BJP: भाजपकडून लोकसभेसाठी धक्‍कातंत्राचा वापर शक्‍य

मिळालेल्या माहितीनुसार कळंगुट पंचायतीने घेतलेल्या निर्णानुसार 5 डिसेंबर रोजी रात्री दोन डान्सबार सील केले आहेत. यामध्ये खोब्रावाडा येथील थ्री किंग्ज प्रेमियम व डेवील या डान्सबारचा समावेश आहे.

कारवाईनंतर पंचायत कर्मचाऱ्यांनी सांगितले की, या डान्सबारकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंचायतीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आणि ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी कारवाईचा सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

Calangute
Calangute: अवैध कृत्यांविरोधात कळंगुट नागरिकांनी घेतला मोठा निर्णय; डान्सबारला आता कायमचीच...

...म्हणून कळंगुट पंचायतीने घेतला बंदीचा निर्णय

कळंगुट पंचायतीने सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी बेकायदा डान्सबारवर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. याबाबत माहिती देताना कळंगुटचे सरपंच जोजफ सिक्वेरा म्हणाले की, सोमवारपासून बेकायदा डान्सबारवर कायमची बंदी आणण्यात येत आहे.

कळंगुट येथे दोन दिवसांपुर्वी कर्नाटकी तरुणांकडून स्थानिक तरुणांना मारहाण झाली आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa dog breed ban court case
Harmanpreet Kaur Captaincy
Goa 97 Voters Electoral Roll
Moushumi Chatterjee boyfriend marriage statement
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com