Dance at the folk festival Dainik Gomantak
गोवा

युवकांनी लोककला जपावी: झिलू गावकर

धावेत लोकमहोत्सव; रसिक मंत्रमुग्ध

दैनिक गोमन्तक

वाळपई: युवकांनी स्वत:ची ओळख निर्माण करावी. लोककला हा पारंपरिक प्रकार आहे. म्हणूनच मातीतील कला जपली पाहिजे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्‍हायला हवे. सत्तरी तालुका लोककलेत सर्वांत पुढे आहे. परराज्यातील तरुण देखील रणमाले गोव्यात येऊन शिकत आहे. हा सांस्‍कृतिक वारसा जपला पाहिजे, असे प्रतिपादन लोककला अभ्यासक, लेखक झिलू गावकर यांनी केले.

श्रीराम क्रीडा व सांस्‍कृतिक कला मंच तार धावेतर्फे आयोजित लोकमहोत्सव श्री सातेरी शांतादुर्गा देवस्थान सभागृहात पार पडला. यावेळी गावकर बोलत होते. व्‍यासपीठावर प्रा. विनय बापट, डॉ. देविदास कोटकर, विष्णू गावकर, दशरथ गावकर, पंच गोपिका गावकर, देवस्थानचे अध्यक्ष बाबलो गावकर, बारकेलो उसपकर, मंचचे अध्यक्ष धुळू शेळके, रणजीत राणे यांची उपस्थिती होती.

महोत्सवात फुगडी नृत्य, समई नृत्य, गोफ, घुमट आरती, रणमाले, कळशी नृत्‍य आदी विविध प्रकार सादर करण्यात आले. त्‍यास उदंड प्रतिसाद मिळाला. गणेश माटणेकर यांनी मनोगत व्‍यक्त केले.

सांस्‍कृतिक वारशाचे जतन ही काळाची गरज

धावे गावाला सांस्‍कृतिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे. लोकमहोत्सव हा सत्तरीतील पूर्वापार आहे. त्‍यामुळे आम्‍ही आमचा वारसा जपला पाहिजे, असे रणजीत राणे म्हणाले. तर, देविदास कोटकर म्हणाले, गावात ज्‍येष्ठ कलाकार आहेत. त्यांनी कलासंवर्धन केली. लुप्त होणारी कला संवर्धित व्हावी. खास आमंत्रित विनय बापट यांनी सांगितले की, स्पर्धांसाठी पुरस्कर्ते मिळतात ही भाग्याची गोष्ट आहे. पारंपरिक खेळांचे जतन झाले पाहिजे. पूर्वी गावचे खेळ होते. कब्बडी, खो खो, कोंडेबार खेळ मातीतील खेळ व्हावेत. लोककला जतनासाठी भाषा जतन झाली पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या भाषेचे संवर्धन करावे. इंग्रजीमुळे गावची भाषा संपत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT