Morjim Beach Dainik Gomantak
गोवा

Accident Death: चिरेखाणीत बुडून युवकाचा मृत्यू

Accident Death: पणजी येथे गेल्या काही दिवसांपासून राज्यात बुडून मरण पावणाऱ्यांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

दैनिक गोमन्तक

Accident Death: पणजी येथे गेल्या काही दिवसांपासून राज्यात बुडून मरण पावणाऱ्यांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काल रविवारी संध्‍याकाळी चिंबल येथे अशीच एक दुर्घटना घडली. मुंबईतून गोव्यात आपल्या नातेवाईकांकडे आलेला डॅरिक राज (१८) हा युवक शिनेर-चिंबल येथील चिरेखाणीत बुडाला.

आज सकाळी त्याचा मृतदेह आढळला. मिळालेल्‍या माहितीनुसार, डॅरिक राज हा दिवाळीनिमित्त चिंबल येथील आपल्या नातेवाईकांकडे आला होता. काल संध्याकाळी तो आपला चुलत भाऊ व इतर मित्रांसमवेत शिनेर-चिंबल येथील चिरेखाणीतील पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. सर्वजण पाण्यात उतरले, पण डॅरिकला पाण्याचा अंदाज न आल्‍याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मित्रांनी प्रयत्न करण्यापूर्वीच तो पाण्यात बुडाला.

घटनेची माहिती मिळताच जुने गोवे अग्निशमन दलाचे जवान व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, मात्र त्‍याचा थांगपत्ता लागला नव्‍हता. आज सकाळी खासगी डायव्हर्सना पाचारण करण्यात आले. त्‍यांनी काही मिनिटांतच डॅरिकचा मृतदेह पाण्‍याबाहेर काढला, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी दिली. चिरेखाणीच्‍या मालकाचीही चौकशी करण्‍यात येणार आहे, असेही ते म्‍हणाले. पुढील तपास उपनिरीक्षक सुदिन रेडकर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT