Ponda News 
गोवा

Ponda News: फोंडा शहरात सगळीकडे खोदाखोदी; वाहतुकीचा खेळखंडोबा

लोक त्रस्‍त; सतावतेय अनेक आजारांची भीती

दैनिक गोमन्तक

फोंड्यात सध्या सगळ्या ठिकाणी खड्डे खोदणीचे काम जोरात सुरू असून त्यामुळे नागरिक त्रस्‍त बनले आहेत. शहरात सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्‍य दिसत असून त्यामुळे अनेक समस्या उद्‍भवायला लागल्या आहेत.

यातले बहुतेक खड्डे हे भूमिगत वीजवाहिनीसाठी खोदण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. पण या खड्ड्यांमुळे फोंड्यातील आधीच बेलगाम झालेल्या वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून अनेक ठिकाणी वाहतूक खंडित होताना दिसत आहे. साहजिकच हे खड्डे म्हणजे वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरू लागले आहेत.

बाजारातील जलवाहिनी आज फुटल्यामुळे काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद झाला असून त्यामुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. सकाळी कामावर जाणाऱ्यांची तर तारांबळ उडाल्याचे दृश्‍य बघायला मिळत होते. एकाच वेळी सगळीकडे खोदकाम सुरू असल्यामुळे ‘रात्र थोडी आणि सोंगे फार’ अशी परिस्थिती अनुभवायला मिळतेय.

त्याचबरोबर या खड्ड्यातून येणाऱ्या मातीमुळे सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी फुफ्फुसाचे विकार होण्याची भीती व्‍यक्त होत आहे.

लवकरच सर्व कामे मार्गी लावणार : रवी नाईक

फोंड्यातील खोदकाम हे भूमिगत वीजवाहिनीसाठी करण्‍यात येत आहे. एकदा हे काम पूर्ण झाले की फोंड्यातील विजेची समस्‍या मार्गी लागेल, असे फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी सांगितले. या खड्ड्यांमुळे नागरिकांना थोडा त्रास होत आहे हे जरी मान्य असले तरी भविष्याचा विचार करून लोकांनी थोडी काळ सोसली पाहिजे. लवकरच सर्व कामे मार्गी लागतील व फोंड्यातील रस्ते हॉटमिक्स होऊन चकाचक होतील, अशी खात्रीही त्यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT