Aarti Competition  Dainik Gomantak
गोवा

Goa : आरती स्पर्धेत ‘मुष्टीफंड हायस्कूल’ विजेते

या स्पर्धेत मुष्टीफंड हायस्कूल कुजिरा यांनी प्रथम पारितोषिक पटकावले.

दैनिक गोमन्तक

Aarti Competition : सरकारी माध्यमिक विद्यालय किर्लावाडा चिंबल व परशुराम मेमोरियल सरकारी माध्यमिक विद्यालय मेरशे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी समर्थ मंदिर सभागृहात तिसवाडी तालुक्यातील शालेय मुलांसाठी गणेश चतुर्थीनिमित्त आरती गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आरती गायनात एकूण 14 गट सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुष्टीफंड हायस्कूल कुजिरा यांनी प्रथम पारितोषिक पटकावले.

या स्पर्धेत श्री दयानंद आर्या हायस्कूल नेवरा यांना द्वितीय, सेंट अलॉयसियस हायस्कूल दिवाडी यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. उत्कृष्ट गजरचे पारितोषिक श्री सरस्वती हायस्कूल जुवे, तिसवाडी गोवा यांना तर मडकईकर नवचैतन्य हायस्कूल कोर्ली तिसवाडी गोवा यांना द्वितीय उत्तेजनार्थ तर प्रथम बालभारती विद्या मंदिर रायबंदर यांना प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले. या स्पर्धेला तिसवाडी तालुक्यातील शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला.

या आरती गायन स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्‍घाटन प्रमुख पाहुणे पालिका प्रशासन संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी केले. यावेळी सम्माननीय अतिथी जिल्हा शिक्षणाधिकारी कविता नाईक गावकर, शाळेचे मुख्याध्यापक विशाल शिंगणापूरकर, स्पर्धा परीक्षक दुर्गाकुमार नावती व शंभू पिळर्णकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षिका साक्षी पंडित व अनुपा भगत यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन शिक्षिका श्वेता पवार व शिक्षिका उषा पुनाजी यांनी केले. शिक्षिका ज्योती अनिल नाईक यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. शिक्षिका सुरेखा देसाई यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली. विद्या पिळर्णकर व दीपा लवंदे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT