Goa Dhangar Community: धनगर समाजाला एसटी दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करू

तानावडे: समाज मेळावा उत्साहात
Goa Dhangar Community:
Goa Dhangar Community:Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Dhangar Community: भाजप सरकारने यापूर्वी प्रथमच धनगर समाजाला उपमुख्यमंत्री पद देऊन सन्मानित केले. धनगर समाजाला एसटी दर्जा मिळावा ही आपलीही भावना आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सोबत घेऊन परत एकदा निकराचा प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

Goa Dhangar Community:
Arambol Beach: हरमलचा समुद्रकिनारा अजूनही विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच

गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाच्या तिसाव्या वर्धापनदिन सोहळ्यात तानावडे बोलत होते. यावेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार गणेश गावकर, माजी खासदार विनय तेंडुलकर,

नरेंद्र सावईकर, सुवर्णा तेंडुलकर, कुशाली वेळीप, अध्यक्ष बाबू कवळेकर, डॉ. जानू झोरे, वाघ मिसाळ, दीपक लांबोर, महाराष्ट्र धनगर समाजाचे नेते श्रावण वाघसे, डॉ. शांताराम सुरमे, डॉ. राजन लांबोर, नेत्रावळीचे सरपंच बुंडा वरक आदी उपस्थित होते.

Goa Dhangar Community:
Mopa Airport: ‘मोपा’मुळे विकासाचा मार्ग ‘सोपा’!

सुभाष फळदेसाई म्हणाले की, धनगर समाजाला न्याय देण्यासाठी सर्वांनी परत एकदा संघटित प्रयत्न करूया असे आवाहन केले. डॉ. जानू सुजरे, ॲड. नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर, आमदार गणेश गावकर यांनीही यावेळी विचार मांडले.

यावेळी तानावडे यांचा शाल, श्रीफळ व समई देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या चार वर्षांत शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधलेल्या दहावी, बारावी, पदवीधर आधी साडेतीनशे विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्ष बाबू कवळेकर स्वागत यांनी स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com