Mopa Airport: ‘मोपा’मुळे विकासाचा मार्ग ‘सोपा’!

पेडणेवासीयांसाठी वरदान : मात्र पीडितांना जमिनींचा योग्‍य मोबदला मिळणे आवश्‍‍यक
Manohar International Airport Mopa
Manohar International Airport Mopa Dainik Gomantak
Published on
Updated on

Mopa Airport: गोव्‍याचा महत्‍वाकांक्षी प्रकल्‍प अर्थात मोपा- पेडणे येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळ हा पेडणेवासीयांसाठी वरदान ठरत आहे. या विमानतळामुळे देशाच्‍या विविध राज्यांतील लोकांचा पेडणेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. गेल्‍या अनेक वर्षांपासून पेडणे तालुक्‍याच्‍या माथी बसलेला मागासलेपणाचा कलंक हळूहळू पुसला जात आहे. संपूर्ण गोव्‍याचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद या प्रकल्पात आहे.

Manohar International Airport Mopa
Goa Rape Case: बलात्कारप्रकरणी शिवप्पा लमाणीला जामीन नामंजूर

मोपा विमानतळामुळे विकासाची कवाडे खुली झाली आहेत. या प्रकल्‍पासाठी अनेकांनी आपल्‍या पूर्वजांच्‍या पिढ्यान्‌पिढ्या राखून ठेवलेल्या जमिनींचा त्याग केला आहे. त्‍याचा काहींना मोबदला मिळाला, पण अनेकजण अजूनही प्रतीक्षेत आहेत. या प्रकल्‍पाच्‍या

विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. येणाऱ्या दिवसांत पेडण्याच्या समृद्धीच्या विकासाबाबत हा विमानतळ मानबिंदू ठरणार आहे. या प्रकल्‍पामुळे पर्यटन, शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक, औद्योगिक तसेच राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. पेडणे तालुका समृद्धीचे दालन म्हणून राज्यात ओळखलं जाईल.

मोपा विमानतळामुळे टॅक्सीवाले, दुकानदार तसेच अनेकांना रोजगार उपलब्‍ध होणार आहे. विमानतळावर मोठी वाहने, बसेस तसेच अन्य वाहने कार्यरत आहेत. त्यासाठी चालकांना रोजगार मिळत आहे. एकेकाळी दाबोळी विमानतळावर काळ्‍या-पिवळ्या टॅक्सीव्यावसायिकांची मक्तेदारी होती. त्यामुळे त्‍यांच्‍यात व पर्यटन टॅक्सीचालकांमध्‍ये वाद होत होते. आता त्‍यावर तोडगा काढून विकासात सर्वांना सामावून घेण्‍याचा प्रयत्‍न आहे.

मोपा आंतरराष्‍ट्रीय विमानतळामुळे पेडणे तालुका भविष्यात विकासाच्या दृष्टीने नंबर वन बनणार आहे. विविध प्रकल्पांतून बेरोजगारांना रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध होत आहेत आणि यापुढेही मिळणार आहेत. स्थानिकांना वाव मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. स्थानिकांनी जमिनींचा केलेला त्याग खूप महत्त्वपूर्ण आहे. त्‍यामुळेच असे मोठे प्रकल्प या परिसरात उभे राहू शकतात. पीडितांना योग्‍य मोबदला दिला जाईल.

- प्रवीण आर्लेकर, आमदार (पेडणे मतदारसंघ)

मोपा विमानतळामुळे गोव्याच्या प्रगतीची दारे खुली झालेली आहेत. विशेषत: पेडणे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्‍प वरदान ठरणार आहे. मात्र सरकारने जमिनी गेलेल्‍यांना ताबडतोब मोबदला दिला पाहिजे. तसेच नोकऱ्यांमध्‍ये स्‍थानिकांना प्राधान्‍य द्यावे. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या कामगारांवर कंपनीने खोटेनाटे आरोप करून पोलिसांत तक्रारी केल्‍या आहेत. असे प्रकार रोखून विश्‍‍वासाचे वातावरण निर्माण झाले पाहिजे.

Manohar International Airport Mopa
Goa Mining : खाण अवलंबितांना ‘बाप्पा पावला’; 177 कोटी मंजूर

- उदय महाले, पेडणे

मोपा विमानतळामुळे फायदा झाला नाही असं मी म्हणणार नाही. अजून तो व्‍हायचा आहे. या प्रकल्पाचा फायदा हा प्राधान्‍याने स्थानिकांना झाला पाहिजे. महत्‍वाची गोष्‍ट म्‍हणजे पकल्‍पासाठी ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना योग्‍य तो मोबदला मिळाला पाहिजे. पण सरकारने त्‍याकडे दुर्लक्ष केलेले आहे. अशा लोकांचे सरकारने सर्व्हेक्षण केले पाहिजे. कुटुंबातील किमान एका व्यक्तीला तरी कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे.

- भारत बागकर, अध्यक्ष (मोपा पंचक्रोशी पीडित जनसंघटना)

मोपा विमानतळामुळे काय फायदा झाला अन्‌ काय तोटा झाला, हा मोठा संशोधनाचा विषय होऊ शकतो. तसं बघितलं तर स्थानिकांना फायद्यापेक्षा तोटाच जास्त झाला. स्थानिकांना रोजगार, व्यवसायाची मोठमोठी स्वप्ने दाखविण्यात आली. पण नशिबात फक्त सेक्युरिटी गार्ड, हाऊसकीपिंग व इतर किरकोळ नोकऱ्या मिळाल्‍या, त्यासुद्धा जीएमआर कंपनीत नाहीत तर कंत्राटाराकडे. त्‍यामुळे तेथेही नोकरीची शाश्‍‍वती नाहीच.

- भास्कर नारुलकर, पेडणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com