Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Elections 2022: कुंकळ्ळीत कोण बाजी मारणार?

महिला मतदार ठरविणार भावी आमदार, सहा दिग्गज रिंगणात

दैनिक गोमन्तक

Goa Elections 2022: कुंकळळी मतदारसंघात सहा दिग्गज उमेदवार एकामेकांसमोर उभे ठाकले असून 14 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचा अंदाज बांधणे कठीण आहे.या मतदारसंघात 29419 मतदार मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत. कुंकळ्ळी पालिका (Cuncolim Municipality) क्षेत्रातील सुमार साडे सोळा हजार मतदान व आंबावली, पारोडा, गिरदोली, माकाझन, चांदर व बाळळी पंचायत क्षेत्रातील तेरा हजार मतदारांच्या हाती भावी आमदारांचे भवितव्य निर्भर आहे.

या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या जास्त आहे. शिवाय पुरुष मतदार मोठ्या संख्येने बाहेर असल्यामुळे साठ टक्के मतदार महिला असून जो उमेदवार महिला स्वीकारतात व महिलांना मान्य असेल तोच उमेदवार कुंकळ्ळीचा आमदार बनणार हे निश्चित.

भाजपचे विद्यमान आमदार क्लाफास डायस गेल्या निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले होते. डायस यांनी अपक्ष उमेदवार ज्योकीम आलेमाव यांचा केवळ 31 मतांनी निसटता राभव केला होता.ज्योकीम आलेमाव यांना मिळालेली पोस्टल मते तांत्रिक कारणांनी बाद ठरविल्यामुळे डायस यांना आमदारकीची लॉटरी लागली होती.डायस यांनी तीन वर्षा नंतर काँग्रेस सोडून इतर नऊ आमदारांबरोबर भाजपात प्रवेश केला होता.डायस यांनी यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढण्याचे जे धाडस केले आहे त्याचा परिणाम मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.एक मात्र खरे माजी आमदार डायस यांना आपली जागा राखण्यासाठी बराच घाम गाळावा लागणार आहे.

या निवडणुकीत तृणमूल व आरजी पक्षाने एन्ट्री घेतल्यामुळे रंगत बरीच वाढली आहे. काँग्रेसतर्फे निवडून आलेल्या डायस यांनी पक्ष सोडला याचे दुःख काँग्रेस कार्यकर्त्यांना असले तरी तृणमूल व आरजीच्या येण्याने काँग्रेसच्या मतांची विभागणी होऊन त्याचा लाभ भाजपला होणार ही भीती काँग्रेसजन व्यक्त करतात.

युरी आलेमाव यांच्या बरोबर नऊ नगरसेवक आहेत,ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. अल्पसंख्याक मतांशिवाय निवडणूक जिंकणे क्लाफासना जड असणार आहे. संतोष फळदेसाई अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत.त्यांनी आंबावली आणि बाळळी पंचायतक्षेत्रात अनुसूचित जमातीची मते घेतल्यास ते इतिहास रचू शकतात. आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रशांत नाईक यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.गेल्या निवडणुकीत आपने एल्विस गोम्स यांना मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून कुंकळ्ळीतून उभे केले होते. मात्र ते 3500पेक्षा जास्त मते घेऊ शकले नव्हते.जी करामत गोम्स करू शकले नाहीत ती प्रशांत नाईक करू शकतील का, हे पहावे लागेल. ट्रायबल सब प्लानचा फायदा मिळवून देणे, कदंबची राजधानी असलेल्या चांदराचा वारसा हक्क टिकवणे, रेल्वे दुपदरीकरण समस्या, पर्यटन विकास असे विषय हाताळणारा आमदार कुंकळळीकरांना हवाय.

एल्विसना डावलल्याचा फटका युरीना बसणार ?

काँग्रेसच्या उमेदवारीवर युरी आलेमाव यांच्या सह एल्विस गोम्स यांनी दावा केला होता. मात्र, एल्विस गोम्स यांना डावलून पक्षाने उमेदवारी युरी आलेमाव यांना दिल्यामुळे एक गट नाराज आहे. या नाराजीचा फटका युरी आलेमाव यांना बसू शकतो.शिवाय युरीला भायलो म्हणजे मतदारसंघाच्या बाहेरून आयात केलेला उमेदवार हा टॅग त्यांच्या विरोधात जाऊ शकतो.

तृणमूल प्रभाव पाडणार का?

तृणमूल कॉंग्रेस (Trinamool Congress) पक्ष कुंकळळी मतदारसंघावर मोठा प्रभाव टाकू शकणार नाही, असे काही दिवसांपूर्वी वाटत होते.मात्र ज्या प्रमाणे डॉ. जोर्सन फर्नांडिस व तृणमूलने प्रचारात आघाडी घेतली आहे,त्याअर्थी जोर्सन सगळ्यांसाठी आव्हान ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT