वास्को: सरकार विकासकामे राबवण्यात अपयशी ठरले असून प्रदेश भाजपने संपूर्ण राज्यातील जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करून ठेवले असल्याचाही ठपका आम आदमी पक्षाचे उमेदवार ॲड.सुनील लोरेन यांनी ठेवला. विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) आप अवश्य इतिहास घडवेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Goa BJP the reason for economic weakness of people)
वास्को मतदारसंघात (Vasco Consistancy) आम आदमी पक्षाचे युवा उमेदवार ॲड. सुनील लोरेन यांनी रविवार (दि.23) वास्को चे ग्रामदेव दामोदर यांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. श्री दामोदर मंदिरातील पुरोहित भूषण जोशी यांनी सामूहिक गाऱ्हाणे घातले. यावेळी आपचे उमेदवार लोरेन यांच्या मातोश्रींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना ॲड. लोरेन म्हणाले,की केंद्र सरकारने विकासकामाच्या नावाने फक्त सर्व मोठ्या प्रकल्पात भ्रष्टाचार चालवला आहे.
भाजपचे (Goa BJP) एकच उद्दिष्ट स्वतःचा विकास कसा साधण्याचा, म्हणूनच गोव्यात बेरोजगारी वाढली असल्याचे लोरेन म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे नेतृत्व गोव्यात अवश्य बदल घडवणार असल्याचे लोरेन यांनी सांगितले. पक्षाचे निमंत्रक राहुल म्हांबरे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्ते एकसंधपणे कार्य करीत आहेत. उमेदवार ॲड. लोरेन यांनी वास्को सेंट अँड्रू चर्च व ओल्ड क्रॉस चे दर्शन घेतले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.