गोविंद गावडेंच्या मतांचे मडकईतून प्रियोळात स्थलांतर?

बीएलओ संशयाच्या घेऱ्यात, तीन महिन्यांपूर्वी मतांचे स्थलांतर केल्याचा गावडेंवर आरोप
Ponda Govind Gaude
Ponda Govind GaudeDainik Gomantak

फोंडा : रिव्होल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांनी गोवाभर न राहत्या पत्त्यावरील मतनोंदीविरुद्ध मोठी मोहीम उघडून, हजारोच्या संख्येने अशा नोंदी रद्दबादल केल्या. तरीही, प्रियोळचे माजी आमदार आणि भाजप उमेदवार गोविंद गावडे यांनी त्यांना चकवा देत तीन महिन्यांपूर्वी आपली दोन मते मडकई मतदारसंघातून प्रियोळ मतदारसंघात स्थलांतरीत केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. ज्या घरावर गावडे व त्यांच्या पत्नी यांची मत नोंदणी झाली आहे, कार्यकर्त्यांचे गावकरवाडा-वेलिंग येथील घर असून, गावडे यांनी आपल्या उमेदवारी सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात याच घरचा पत्ता टपाल पत्ता म्हणून नमूद केला आहे. (Govind Gaude News Updates)

Ponda Govind Gaude
AAP : ...म्हणून माजी मंत्री दयानंद नार्वेकर अपक्ष निवडणूक लढवणार!

भाजप (BJP) उमेदवार गोविंद गावडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपला पत्ता, घर नंबर 196/2 गोठण-वेलिंग, मंगेशी -फोंडा असा दिला आहे, तर याच पत्त्यावर गावडे व त्यांच्या पत्नी रिना गावडे यांचे नाव नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत क्रमांक 803 व 804 नुसार पार्ट 43 अंतर्गत नोंद प्रकाशित झाली आहे.

2021 साली प्रकाशित यादीत गोविंद गावडे यांच्या सोबत त्यांच्या पत्नीचे व मातोश्रीचे नाव धोणशी-बांदोडा येथील घर क्रमांक 144-इ या पत्त्यानुसार नोंदणी क्रमांक अनुक्रमे 461, 463 व 460 अंतर्गत पार्ट 20 मध्ये नोंद असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात निवडणूक आयोगाने यातील तीन पैकी गावडे व त्यांच्या पत्नी अशी दोन नावाची येथून रद्द करण्याची परवानगी दिली, तर त्याच महिन्यात ही दोन नावे वरील वेलिंग येथील पत्त्यावर स्थलांतरित करण्यात परवानगी दिल्याचे याच संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.

Ponda Govind Gaude
लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर यांच्या बंडाचा भाजपवर परिणाम काय?

बीएलओ संशयाच्या घेऱ्यात

मतदार यातीन नवीन नोंदणी करणे किंवा त्यातील नावे वगळणे हे काम बीएलओच्या अहवालावर अवलंबून असते. सदर व्यक्ती दिलेल्या पत्त्यावर राहते, की नाही याची शहानिशा करून तो अहवाल द्यायचा असतो. सदर प्रकरणात वेलिंग प्रियोळ (Priol) पंचायतीच्या नोंदणी नुसार वेलिंग येथे नमूद केलेले घर किशोरी केशव गावडे यांच्या नावावर असून त्या तिथे आपला पती व दोन मुलगे यांच्या सोबत राहत आहे.

गोविंद गावडे यांनी आपल्या प्रतिज्ञा पत्रात स्वतःच्या मालकीचे एकमेव घर बांदोडा पंचायतीत सर्वे क्रमांक 156/0 येथे असल्याचे नमूद केले आहे. अशा वेळी बिएलओने ते वेलिंगमध्ये राहतात, असा अहवाल कशावरून दिला यावर प्रश्न निर्माण झाले आहेत. यात गावडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करत सदर बिएलओला सदर यादीत आपले नाव घुसवायला प्रवृत्त केल्याचीही चर्चा सध्या आहे. उपलब्ध माहितीनुसार किशोरी केशव गावडे यांच्या कुटुंबीयांचे मतदान त्याच्या मूळ गावी म्हणजे केऱी-फोंडा येथे आहे. पण त्या कुटुंबासहित वेलिंग येथेच काही वर्षापूर्वीच बांधलेल्या या नवीन घऱात राहत आहेत. विशेष म्हणजे तिचे दोन्ही मुलगे हे गोविंद गावडे यांचे कट्टर कार्यकर्ते असल्याचेही समजले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com