Divar Island Dainik Gomantak
गोवा

Divar Island: चोडण, दिवाडी बेटावर पुलाची बांधणी कधी?

Divar Island: अनेकांचा प्रश्‍न : रुग्णांचे होतात हाल

दैनिक गोमन्तक

Divar Island: काँग्रेस आणि भाजप सरकारच्या काळात चोडण आणि दिवाडी या बेटांना रायबंदरशी जोडणाऱ्या मांडवी नदीवरील पुलाची सतत मागणी होत आली आहे. परंतु ही मागण्या कधी पूर्ण होणार, असा प्रश्‍न मांडवी नदीतून जलमार्गाद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच पडत असतो.

दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना 2011 मध्ये दिवाडी येथील मांडवी नदीकाठी उभारलेला पायाभरणीचा शिलान्यास नजरेस पडतो. त्यावेळी 600 कोटींचा तो पुलाचा प्रस्ताव होता. विशेष बाब म्हणजे पूल उभारला जाणार म्हणून बेटावर निदर्शने झाली होती. त्यामुळे पुलासाठी जमीन संपादित करता आली नाही, हा इतिहास आहे. आता कुंभारजुवेचे काही लोक रायबंदर ते दिवाडी या पुलासाठी आग्रही आहेत. रात्रीच्या वेळेस बेटावर आजारी पडल्यास त्यांना फेरीबोटीतून मांडवी पार केल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये नेता येत नाही.

रायबंदर ते चोडण असा पूल झाल्यास डिचोली ते पणजी असे म्हापसामार्गे येण्यासाठी लागणाऱ्या 33 किलोमीटर अंतरातील 12 ते 13 किलोमीटर अंतर कमी होणार आहे. डिचोली, मये, साखळी या परिसरातील लोक कामानिमित्त दररोज पणजीला ये-जा करतात. त्यांना चोडण बेट ते रायबंदर ही फेरीसेवा अत्यंत महत्त्वाची बनलेली आहे.

लागतात वाहनांच्या रांगा

अलीकडे वाहनांची संख्या वाढल्याने संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी फेरीमध्ये जाण्यासाठी रायबंदर येथे लांबच लांब वाहनांच्या रांगा दिसतात. या फेरीधक्क्याजवळ उभारण्यासाठी किंवा बसण्यासाठी कोणतीही सोय नाही, त्यामुळे वाहनधारकांना विशेषतः दुचाकीस्वारांना रांगेत उभे राहावे लागते. याशिवाय महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या सुविधेशिवाय पर्याय राहत नाही.

...तर वाढेल लोकांचा उपद्रव

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी दिवाडी बेटाला भेट दिली, तेव्हा तेथील सरपंच राज्यपालांकडे आम्हाला पूल नको, असा प्रस्ताव घेऊन आले होते. पूल नको, असे म्हणणे त्यांनी पहिल्यांदाच ऐकले होते. त्याचे कारण विचारल्यावर सरपंचांनी या बेटावर लोक मोठ्या प्रमाणात येतील, त्यांचा उपद्रव वाढेल आणि येथील शांतता नष्ट होईल, त्यामुळे पूल मंजूर न करण्याची विनंती केल्याचे राज्यपालांनी त्यावेळी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: वाचनालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचा विचार करू, CM सावंतांचे विधानसभेत आश्‍‍वासन

Goa Assembly Live: धार्मिक आणि व्यवहारिक भाषा ही 'मराठी' - आमदार जीत

Mapusa heavy rain: म्हापशात दाणादाण! मुसळधार पावसानं झोडपलं; 24 तासांत 4 इंच पाऊस, रस्ते पाण्याखाली

Horoscope: 'या' 3 राशींवर आज धनवर्षा होणार! लक्ष्मीमातेच्या कृपेमुळे लाभच लाभ

Goa: पालिकांच्या विकासाला चालना देणारे विधेयक विधानसभेत सादर, 'अ' वर्ग नगरपालिकांची सदस्य संख्या 25 वरून 27 होणार

SCROLL FOR NEXT