अनिल पाटील
Panjim City: पणजी देशातील सर्वात जुनी राजधानी आहे. तिला 180 वर्षे पूर्ण होत आहेत. काळाच्या ओघात नेटकेपणाने वसवलेले शहर आता स्मार्ट सिटीच्या निमित्ताने आपले रूपडे बदलत असले तरी तो जुना ऐतिहासिक वारसा टिकेल का? हा यक्षप्रश्न आज ही सतावत आहेच. गोव्याची ही चौथी राजधानी विविध अर्थाने आता परिपूर्ण शहर बनतेय; पण या ऐतिहासिक शहराने आपले वेगळपण आजही टिकवून ठेवले आहे.
पोर्तुगिजांनी सुरवातीला तिसवाडीवर कब्जा केला आणि हळूहळू आपला साम्राज्यवादी धार्मिक विस्तार वाढवत नेला. पोर्तुगिजांनी धर्म आणि राजसत्तेने तिसवाडीतील ऐला गोवा अर्थात जुन्या गोव्यामध्ये बंदराच्या निमित्ताने आपले बस्तान बसवले. आशिया खंडातील भव्य-दिव्य धर्मकेंद्रे चर्च उभारली. पुढे प्लेगच्या साथीमुळे त्यांनी आपली राजधानी नोव्हा गोवा अर्थात पणजीत हलवली. कालांतराने तिला राजधानीचा दर्जा जाहीर करण्यात आला आणि तो आजही टिकून आहे.
पोर्तुगीजकालीन ताम्रपट उपलब्ध
राजधानीचा अधिकृत दर्जा २२ मार्च १८४३ रोजी देण्यात आला. पणजी या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. या शहरातून पूर्वीकडील मध्य आशियाई देशाशी व्यापार होता याचे अनेक पुरावे आजही मिळतात, तर आदिलशाहने उन्हाळ्यात राहण्यासाठी उभारलेला पॅलेस आजही आदिलशाह पॅलेस म्हणून आजही तितक्याच दिमाखात उभा आहे. त्या काळातील अनेक ताम्रपट आजही उपलब्ध आहेत.
1 हजार कोटींचा निधी
केंद्र सरकारने पणजीला स्मार्ट सिटी म्हणून घोषित करून १ हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. याअंतर्गत शहराची कामे सुरू आहेत. यात सांडपाणी, रस्ते, लाईट, पार्क-उद्यानांचे सुशोभीकरण, पुलांची पुनर्बांधणी, नव्या तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या वायरिंग सिस्टम असा अनेक बाबींचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.