Goa Agriculture: कृषी संस्कृतीची जपणूक

Goa Agriculture: आजही ताळगावसारख्या ठिकाणी नागरिक भातशेती, भाजीपिके घेताना दिसतात.
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Gomantak

गंगाराम आवणे

Goa Agriculture: तिसवाडी तालुका हा विकसित तालुका असून या ठिकाणी मोठमोठी आस्थापने, कार्यालये, कंपन्या, पर्यटन, आदी बाबी अधिक पाहायला मिळतात; परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातदेखील येथील नागरिकांनी आपली कृषी संस्कृती जोपासली आहे. आजही ताळगावसारख्या ठिकाणी नागरिक भातशेती, भाजीपिके घेताना दिसतात.

Goa Agriculture
Panjim City: राजधानी पणजीचा ऐतिहासिक वारसा टिकेल का?

तिसवाडी खरीप तसेच रब्बी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. कुळागार, काजू तसेच इतर प्रकारच्या पिकांची लागवडदेखील होते. राज्यात एकूण १ लाख ४३ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रफळ लागवडीखाली आहे. तिसवाडी तालुक्यात १० हजार ७३८ हेक्टर क्षेत्रफळावर लागवड केली जाते.

लागवडीखाली असलेले क्षेत्रफळ खालीलप्रमाणे

  • भात - ४,१७५

  • कडधान्ये आणि तेलबिया - १३१

  • काजू - ३,२४१

  • सुपारी - २

  • मिरी - २

  • मसाले झाडे - ३

  • बटाटा कणगी - ३१

  • आंबा - २३४

  • केळी - २८

  • अननस - २

  • बागायती पिके - ९७१

  • नारळ - १,७०५

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com