Water Scarcity Dainik Gomantak
गोवा

Ponda Water Scarcity: जलसाठे, धरणे कोरडी; शहरात पाण्याचे भीषण संकट

अनियमित पाणीपुरवठा असल्याने नागरिकांत संताप

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Water Scarcity फोंडा शहरात गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा व्यवस्थित व नियमित होत नसल्याने फोंडावासीयांनी पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते विराज सप्रे म्हणाले की, स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री रवी नाईक यांच्याकडे फोंडा शहरातील स्थानिकांसाठी अतिरिक्त पाण्याची टाकी उभारण्याची विनंती केली आहे.

सेंट मेरी हायस्कूल येथे पाण्याची टाकी आहे; परंतु सध्या मर्यादित पाणीपुरवठा आणि नळाच्या पाण्याचा दाब नसल्यामुळे त्यांना पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे.

उंच इमारतीत राहणाऱ्या स्थानिकांना पाणी मिळण्यात अडचण येत असून त्यांनी दाग-फोंडा येथील सार्वजनिक पाणी विभागाला कळविले आहे, असे सप्रे यांनी सांगितले.

गेल्या तीन दिवसांपासून फोंडा शहरात पाण्याचे भीषण संकट उभे आहे. गोव्यात सध्या जलसाठे, धरणे कोरडी पडली आहेत.

म्हैसाळ धरणाची पातळी जमिनीवर आल्यानंतर शिरोडा आणि पंचवाडी स्थानिकांनाही जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांना ओपा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो, अशी माहिती मिळाल्याचे सप्रे यांनी सांगितले.

म्हैसाळ येथील धरण कोरडे पडल्यानंतर ओपाचे पाणी शिरोडा, येथे वळविण्यात आल्याने फोंडा येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. फोंड्यातील राजकारणी राजकारणात व्यस्त असल्याने त्यांना सामान्य लोकांचे पडलेले नाही.

पाणीटंचाईमुळे लोक किती त्रस्त आहेत याची त्यांना मुळीच कदर नाही. चार वर्षांपूर्वी फोंडा येथे नवीन पाण्याची टाकी प्रस्तावित केली होती. कामाचा शुभारंभही केला होता; पण आज टाकीही नाही आणि आम्हाला पाण्याचा दाबही नाही.

ओपाचे पाणी थेट सेंट मेरी हायस्कूलजवळील पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचते आणि नंतर फोंडा शहरातील विविध भागांना पुरवले जाते. या टाकीतून पंचवाडी व शिरोडा येथेही पाणीपुरवठा केला जातो, त्यामुळे फोंडा शहरात पाण्याचा खेळ चालू आहे.
- विराज सप्रे, सामाजिक कार्यकर्ते

म्हैसाळ धरणाचे दीड ते दोन एमएलडी पाणी सध्या पंचवाडी या एकाच गावात दिले जात आहे. आजपर्यंत या धरणाचे पाणी कमी होत नव्हते. यंदा ही परिस्थिती उद्भवली आहे.

पाऊस आला नाही तर पंचवाडी भागात पाण्याची टंचाई होण्याची शक्यता आहे आणि असे झाल्यास ओपा प्रकल्पातून त्यांना पाणीपुरवठा केला जाईल.
- शैलेश नाईक, जलस्रोत खात्याचे साहाय्यक अभियंता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

SCROLL FOR NEXT