Goa Youth Congress सध्याचे भाजप सरकार आपण डबल इंजिन सरकार म्हणून धिंडोरा पिटवते आहे. त्यामुळे त्यांचे घोटाळेही असे डबल होत असावेत. कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक सहाय्यकांच्या भरतीतील घोटाळ्यातील रक्कम दुप्पट करण्याच्या तयारीत गोव्यातील भाजप सरकार आहे.
सार्वजनीक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी घेतलेली रक्कम 70 कोटींवरून 140 कोटींपर्यंत दुप्पट केल्याचा गंभीर आरोप गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विवेक डिसिल्वा यांनी केला आहे.
गोवा युवक काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) तर्फे विवेक डिसिल्वा, साईश आरोसकर, यश कोचरेकर, लिवेन सिल्वेरा, तेजस दिवकर, अनिकेत कवळेकर, नौशाद चौधरी, प्रसन्नजीत ढगे, अल्वारो फेराव, शिफरन सय्यद आणि इतरांनी आज आल्तिनो येथे सार्वजनीक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेवून त्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
सरकारने नवीन डिप्लोमा धारक आणि अभियांत्रिकीतील पदवीधरांना कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक सहाय्यकांच्या पदासाठी जारी केलेल्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकलाव्यात आणि नव्याने उत्तीर्ण झालेल्यांना अर्ज करण्यासाठी आणि परीक्षेला बसण्यासाठी नवीन तारखा जाहीर कराव्यात, अशी आपण मागणी करत असल्याचे विवेक डिसिल्वा यांनी सांगितले.
सरकारने भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कर्मचारी निवड आयोगामार्फत परीक्षा घेतल्या पाहिजेत.
2021 मध्ये जाहीर केलेल्या कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक सहाय्यकांच्या पूर्वीच्या भरती प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करावी.
तसेच यापूर्वीच्या रोजगार घोटाळ्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नौशाद चौधरी यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.