Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

Viral Video: "मी मूळ हिंदूच, आमचे नंतर धर्मांतर केले" गोव्यातील कॅथलिक मंत्र्याचे वक्तव्य

Minister Mauvin Godinho: गोव्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो त्यांच्या एका मतामुळे वादाच्या चक्रात अडकण्याची शक्यता आहे

Akshata Chhatre

Mauvin Godinho Viral Video on Hinduism

धर्माच्या नावाखाली मठ-मंदिर, पर्तगाळ मठात भरपूर पैसे लुटतात, असे वक्तव्य उद्योजक, लेखक दत्ता नायक यांनी केले होते. यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे दत्ता नायक यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली. एका टीव्हीच्या खासगी मुलाखतीत केलेल्या या व्यक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या या वादाला धरून गोव्यात धार्मिक विषयाला उधाण आले आणि आणि अशात गोव्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो त्यांच्या एका मतामुळे वादाच्या चक्रात अडकण्याची शक्यता आहे.

मंत्री माविन गुदिन्हो हे पक्षाच्या एका सभेत बोलत असताना त्यांनी एक विधान केले होते आणि सध्या त्यांच्या याच विधानाने जोर पकडला आहे. राजीव गांधी पंतप्रधान असतानाचा एक किस्सा सांगताना ते म्हणाले कि त्यांना त्यांच्या धर्मामुळे कुठ्ठाळी येथून निवडणूक न लढवण्याचा सल्ला दिला होता. एक ख्रिस्ती धर्मीय हिंदू समाज अधिकप्रमाणात असलेल्या ठिकाणी जिंकू शकत नाही असेही त्यांना सांगण्यात आले होते.

मात्र यावर मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांना कायम आव्हानं स्वीकारायला आवडतात असे म्हणत त्यांचा निर्णय पक्का असल्याचं ठणकावून सांगितलं होतं, आणि त्यानंतर १९८९ पासून मंत्री माविन गुदिन्हो यांच्या यशाची सुरुवात झाली असं ते म्हणालेत.

काही वर्षानंतर पुन्हा निवडणुकीच्यावेळी त्यांच्या जिंकण्यावर प्रश्न निर्माण करण्यात आला होता आणि यावेळी हिंदू लोकांवर माझा विश्वास आहे. हिंदू लोकांशी माझा संबंध खूप दृढ आहे आणि मी स्वतःच्या धर्मापेक्षा जास्ती हिंदूच असल्याचं विधान मंत्री माविन गुदिन्हो यांनी केलं. मी हिंदूच आहे, आमचं धर्मपरिवर्तन करण्यात आलंय आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही असंही मंत्री माविन गुदिन्हो म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT