Datta Naik: मठ-मंदिरांबाबत वक्तव्य; उद्योजक, लेखक दत्ता नायक यांच्या विरोधात पोलिस तक्रार
Datta Damodar NaikDainik Gomantak

Datta Naik: धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; उद्योजक, लेखक दत्ता नायक यांच्या विरोधात पोलिस तक्रार

Datta Damodar Naik: धर्माच्या नावाखाली मठ-मंदिर, पर्तगाळ मठात भरपूर पैसे लुटतात, असे वक्तव्य दत्ता नायक यांनी केले होते.
Published on

काणकोण: मठ-मंदिर, पर्तगाळ मठ आणि भट पुरोहित वर्गा विषयी भाष्य केल्याप्रकरणी उद्योजक, लेखक दत्ता नायक यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. धर्माच्या नावाखाली मठ-मंदिर, पर्तगाळ मठात भरपूर पैसे लुटतात, असे वक्तव्य नायक यांनी एका टीव्हीच्या खासगी मुलाखतीत केले होते. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक शांततेचा भंग व धार्मिक भावना दुखावल्याबद्दल दत्ता दामोदर नायक यांच्या विरुद्ध काणकोण पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलीय. नायक यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केले होते. यावेळी त्यांनी धर्माच्या नावाखाली मठ-मंदिर, पर्तगाळ मठात भरपूर पैसे लुटतात, असे वक्तव्य केले होते.

Datta Naik: मठ-मंदिरांबाबत वक्तव्य; उद्योजक, लेखक दत्ता नायक यांच्या विरोधात पोलिस तक्रार
'धर्माच्या नावाखाली देऊळ, मठात भरपूर पैसे लुटतात'; लेखक दत्ता नायक यांच्या वक्तव्यामुळे गोव्यात नव्या वादाची शक्यता

नायक यांच्या वक्तव्यावर माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी आक्षेप घेतला होता. देवळे व मठ/मंदिरांनांच का म्हणून हिणवावे?, असा सवाल सावईकरांनी उपस्थित केला होता. याशिवाय सोशल मिडियातून देखील नायक यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी आता नायक यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल झालीय.

काय म्हणाले होते दत्ता दामोदर नाईक?

"मी मुळात सेक्युलर विचाराचा आहे. हिंदुत्ववाद, भाजप, आरएसएस हे मला मान्य नाही. ख्रिश्चन, मुस्लिमांचा द्वेष करुन हा देश खड्यात जाईल. मी देवळात दान करत नाही. मठ-मंदिर, पर्तगाळ मठात भरपूर पैसे लुटतात", असे वक्तव्य नायक यांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com