Datta Naik: दत्ता नायक पुरावा देऊ शकतील का? 'सोशल मीडिया'वर जोरदार चर्चा

Datta Naik Controversy: काहीजणांनी नायक यांच्‍यावर टीका केली आहे, तर काहीजणांनी नायक काय चुकीचे बोलले, असा प्रश्‍न करून त्‍यांना पाठिंबा दिला आहे.
Datta Naik Controversial Statement
Datta Damodar NaikDainik Gomantak
Published on
Updated on

Datta Naik Controversial Statement

मडगाव: मी पर्तगाळ मठाचा अनुयायी असून या मठाला आणि पुरोहितांना ‘लुटारू’ असे म्‍हणून दत्ता नायक यांनी घोर अपराध केला आहे, असे सतीश व्‍यंकटराय भट यांनी काणकोण पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे.

यापूर्वी भाजपचे माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांनी ‘फेसबुक’वरून या वक्‍तव्‍याला आक्षेप घेत, ‘आस्‍तिक असणे किंवा नास्‍तिक असणे, हा ज्‍याच्‍या त्‍याच्‍या श्रद्धेचा भाग आहे. आपल्‍या विचारावर ठाम राहणे हे देखील योग्‍य आहे. पण त्‍यासाठी देवळे आणि मठांना का म्‍हणून हिणवावे’ असा प्रश्‍न केला होता.

त्‍यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. समतावादी चळवळीतील कार्यकर्ते रमेश गावस यांनी दत्ता नायक यांचा हा विचार उचलून धरताना तिरूपती बालाजी मंदिरात भक्‍तांकडून ज्‍या रितीने पैसे वसूल केले जातात, त्‍याला लूट म्‍हणायची नाही तर आणखी काय म्‍हणायचे, असा सवाल केला आहे. तर माेहनदास लोलयेकर यांनीही नायक यांना पाठिंबा देताना, दत्ता नायक यांचे काय चुकले, असा सवाल केला आहे.

Datta Naik Controversial Statement
Subhash Velingkar: फ्रान्‍सिस झेवियरच्या कृपेने गोव्यात 250 वर्षे जगातील 'अत्यंत क्रूर' न्यायालय होते : वेलिंगकर

मंदिरे आणि मठांनी बहुजन समाजावर अत्‍याचार केले आहेत, हे माझे वैयक्‍तिक मत आहे. दुसऱ्या बाजूने नायक यांच्‍यावर भरपूर टीकाही झाली आहे. चित्रकार योगेश प्रभुगावकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना देवळांना पैसे द्या किंवा देऊ नका, ती तुमची मर्जी. मात्र, देवळांना आणि मठांना लुटारू म्‍हणणे अत्‍यंत आक्षेपार्ह आहे. पर्तगाळ मठाबद्दल सांगायचे झाल्‍यास, या मठाकडे भरपूर पैसा आहे आणि या मठाला दुसऱ्यांनी पैसा देण्‍याची गरजच नाही. यामठाने कसे लुटले याचा दत्ता नायक पुरावा देऊ शकतील का? असा सवाल त्‍यांनी केला.

Datta Naik Controversial Statement
Datta Naik: धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; उद्योजक, लेखक दत्ता नायक यांच्या विरोधात पोलिस तक्रार

समाजमाध्यमांवर साधक-बाधक चर्चा

यासंदर्भात समाज माध्‍यमांवरही जाेरदार चर्चा सुरू असून काहीजणांनी नायक यांच्‍यावर टीका केली आहे, तर काहीजणांनी नायक काय चुकीचे बोलले, असा प्रश्‍न करून त्‍यांना पाठिंबा दिला आहे. हा प्रश्‍न माजी खासदार ॲॅड. नरेंद्र सावईकर यांनी ‘फेसबुक’वरून चर्चेत आणला होता. त्‍यावर त्‍यांना सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते मोहनदास लोलयेकर यांनी यावर ‘सावईकर हे जर आपल्‍या मतावर ठाम असतील तर त्‍यांनी दत्ता नायक यांच्‍याशी या विषयावर जाहीरपणे चर्चा करावी’ असे आव्‍हान दिले आहे.

दत्ता नायक हे देवाला मानत नसतील तर तो त्‍यांचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे. मात्र, त्यांना मंदिरांना किंवा देवांना वाईट बाेलण्‍याचा अधिकार कुणीही दिलेला नाही. आमच्‍या श्रद्धास्‍थानांना तसेच पुरोहितांना लुटारू म्‍हणणे म्‍हणजे, नायक यांनी आपली मर्यादा ओलांडल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

सतीश व्‍यंकटराय भट, पर्तगाळ-पैंगीण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com