Siddhi naik Case Dainik Gomantak
गोवा

Siddhi Naik Case : ‘सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्या’

हे प्रकरण नव्याने चौकशीसाठी सीबीआयकडे देण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आणि आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Siddhi Naik Case : कळंगुट येथे मृतावस्थेत सापडलेल्या सिद्धी नाईक हिच्या मृत्यूप्रकरणी तिच्या कुटुंबियांनी केलेल्या खुनाच्या आरोपामुळे क्राईम ब्रँचने तपास सुरू केला होता. या प्रकरणाच्या तपासकामात सरकारच्या उदासिनता व असमर्थतेमुळे या मुलीच्या गरीब कुटुंबाची निष्पक्ष व सखोल चौकशी नाकारण्यात येऊन त्यांना न्याय देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे प्रकरण नव्याने चौकशीसाठी सीबीआयकडे देण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने सिद्धी नाईक प्रकरणाचा तपास संपला असून लवकरच हे प्रकरण बंद करण्यासाठी न्यायालयात अहवाल सादर केला जाईल अशी माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. या प्रकरणातील सर्व बाजू तपासून तसेच सिद्धी हिला पाहिलेल्या लोकांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी जमा केलेल्या माहितीवरून तिचा खून झाल्याचे ठोस धागेदोरेच पुढे येत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार ते बंद करण्याचा निर्णय झाला आहे. या मुलीने आत्महत्या करण्यामागील कोणतेच ठोस कारण तपासातही पुढे आलेले नाही. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत ती बेपत्ता झाल्यापासून दुसऱ्या दिवशीच सापडला होता. त्यामुळे तिच्या या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त केला गेला होता. सरकारनेही हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे तपासासाठी दिले होते.

या प्रकरणाचा तपास बंद करण्याचे वृत्त प्रसिद्ध होताच काही एनजीओनी तसेच विरोधी नेत्यांनी याविरुद्ध आवाज उठविला होता. सिद्धी नाईक यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात हे सरकार गंभीर नाही अशी टीका सुरू झाली होती. त्यामुळे हा तपासकाम बंद करण्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचा निर्णय तूर्त क्राईम ब्रँचने लांबणीवर टाकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT