Goa Congress : सरकारला महागाई कमी करण्याची बुद्धी दे!

काँग्रेसचे ‘बाप्पा’ला साकडे : ‘महागाईवर चर्चा’ मोहिमेचा समारोप
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress : अलीकडेच केंद्राने जीवनावश्‍यक वस्तूंवरही कर लावला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक भरडून निघाले आहेत. अशा महागाईतच गणेश चतुर्थी साजरी होत आहे. विघ्नहर्त्याने महागाई कमी करण्याची बुद्धी भाजप सरकारला द्यावी, अशी मागणी करत काँग्रेसने राज्यात तीन दिवस महागाईवर चर्चा मोहिमेचे आयोजन केले होते. त्याचा समारोप आज उत्तर गोव्यात पणजीत आणि दक्षिण गोव्यात कुडचडे येथे करण्यात आला. पणजीत आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, आमदार कार्लुस फेरेरा यांच्या मार्गदर्शनाखाली ही चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या मार्केट इमारतीसमोर प्रवेशद्वारात झालेल्या या आंदोलनास कॉंग्रेस प्रवक्ते संजय बर्डे, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक, प्रदेश युवा काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आमदार रुडॉल्फ म्हणाले की, केंद्र सरकार केवळ अदानी आणि अंबानी कुटुंबांचा फायदा करून देत आहे. त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हे सरकार करीत आहे. सामान्य जनता मात्र महागाईच्या दुष्टचक्रात अडकली आहे.

सणासुदीतही ससेहोलपट

आमदार फेरेरा यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. काँग्रेसचे राज्य होते, त्यावेळी शंभर-दोनशे रुपयांत मिळणारी वस्तू भाजपच्या काळात दुप्पट-तिप्पट रक्कम देऊन खरेदी करावी लागत आहे. वस्तू सेवा कराच्या माध्यमातून सरकार जनतेला लुटत आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून, गरीब लोकांनी काय करायचे? असा सवालही त्यांनी केला.

Goa Congress
Sonali Phogat Case : सोनाली फोगट प्रकरणात आता ड्रग्स डिलरचा शोध

एवढे पोलिस कशासाठी!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वत:भोवती सतत पोलिसांचा लवाजमा घेऊन फिरतात. या पोलिसांचे वेतन जनतेच्या करातून दिले जाते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना एवढी भीती का वाटते? पर्रीकर यांच्याभोवती एवढा बंदोबस्त नसायचा. परंतु डॉ. सावंत यांना एवढे पोलिस कशासाठी लागतात, असा प्रश्‍न प्रवक्ते संजय बर्डे यांनी केला.

अमित पाटकर दिल्लीला रवाना

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर रविवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. येत्या ७ सप्टेंबरपासून देशभर काँग्रेस पक्षातर्फे ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सर्व राज्यांतील प्रदेशाध्यक्ष या बैठकीस उपस्थित राहाणार आहेत. या यात्रेसाठी पक्षातर्फे प्रत्येक राज्याला जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com