CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Excise Scam: दक्षता खाते करणार अबकारी घोटाळ्याची चौकशी; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे संकेत

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Excise Scam: दैनिक ‘गोमन्तक’ने उघड केलेला अबकारी खात्यातील घोटाळा सध्या हिमनगाच्या टोकासारखा आहे की काय, अशी परिस्थिती आहे. अनेक जणांच्या तक्रारी खात्याकडे येतच असून सरकारने आता हा घोटाळा दक्षता खात्याकडून चौकशी करून आवश्‍यकता भासल्यास हे प्रकरण भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पेडणे येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सावंत म्हणाले की, या घोटाळ्यासंदर्भात खात्यांतर्गत चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकरणातील सूत्रधार अव्वल कारकून हरिश नाईक याच्यासह अबकारी खात्यातील निरीक्षक दुर्गेश नाईक आणि विभूती शेट्ये यांना बडतर्फ केले आहे.

याशिवाय संबंधितांकडून मूळ रक्कम 18 लाख आणि व्याजासह दंड म्हणून 10 लाख रुपये, असे 28 लाख रुपये वसूल केले आहेत. आवश्‍यकता भासल्यास हे प्रकरण दक्षता खात्याकडे वा भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे सोपवण्यात येईल.

या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. दोषी असलेल्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

विरोधक आक्रमक

मद्य विक्री परवाना नूतनीकरणातून व्यावसायिकांनी अबकारी खात्याला सुमारे दोन कोटी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप कॉंग्रेसच्या संजय बर्डे यांनी केला असून या विरोधात राज्य सरकार अबकारी आयुक्त नारायण गाड आणि संबंधित दोषींविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

आता या प्रकरणाला आक्रमकता आली असून संशयितांनी इतर मार्गांनीही पैसे मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गृहखाते संशयाच्या घेऱ्यात

मुख्यमंत्री हे गृह खात्यासह अबकारी खातेही सांभाळतात. त्यामुळे गृह खात्याच्या साहाय्याने अबकारी खात्याच्या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी ते सहजपणे करू शकतात. असे असताना संबंधितांच्या विरोधात प्रशासनाने फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्‍न उपस्थित करत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या कृतिशून्य मौनावर प्रश्‍न उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Andha Salim Arrested: खून, खंडणी, दरोडा, घरफोड्या करणाऱ्या 'अंधा सलीम'ला अटक; गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकात गुन्हे

Boriem Bridge: बोरी पुलासाठी हवीये आणखीन जागा! 'या' 3 गावांसाठी MoRTHची नवी अधिसूचना, आक्षेप घेण्यासाठी 21 दिवसांची मुदत

मंत्रिपद नाही पण मायकल लोबोंना महामंडळ मिळाले; माजी उपमुख्यमंत्री कवळेकरांना कला अकादमीच्या अध्यक्षपदाची लॉटरी

Shetkari Aadhar Nidhi Scheme: पावसानं झोडपलं, सरकारनं सावरलं, 'डिसेंबरपर्यंत प्रति हेक्टर 40 हजार भरपाई देणार'; CM सावंतांची मोठी घोषणा

Bicholim: डिचोलीत दिवसाढवळ्या इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

SCROLL FOR NEXT