Goa Monsoon 2023: गोव्यात 8 जुलैपर्यंत बसरणार मुसळधार; गोवा वेधशाळेचा अंदाज

समाधानकारक पावसाने शेतकरीही सुखावले
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Gomantak

Goa Monsoon 2023: गोव्यात 08 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यम पाऊस ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

Goa Monsoon 2023
Goa Someya Kumari: आधी IAS परिक्षेत यश, आता IFS मध्येही मिळवली रँक; गोव्याच्या सोमेया कुमारीचे दुहेरी यश!

दोन्ही जिल्ह्यातील काही भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी होऊ शकते. या काळात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. गोव्यात जुनमधील सुरवातीच्या दिवसांमध्ये पावसाने पाठ फिरवली होती. पण जुनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोर धऱला आहे.

तेव्हापासून गोव्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीसह पिण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठीही पाण्याची उपलब्धता होऊ लागली आहे.

जूनच्या उत्तरार्धापर्यंत पाऊस लांबल्याने राज्यातील जलाशय आटू लागले होते. काही ठिकाणी सरकारने पाणी पुरविण्याचे नियोजन चालवले होते. पण गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने आता अनेक जलाशयांमध्ये पुन्हा पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com