Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

'रस्त्यांचे हॉटमिक्सिंग वाहून गेल्याप्रकरणी दक्षता खात्यामार्फत चौकशी करा'

महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी : दोन महिन्यापूर्वी हॉटमिक्सिंग केलेल्या पणजी आणि ताळगावातील रस्त्यावरील हॉटमिक्सिंग मॉन्सूनच्या पहिल्या महिन्यातच वाहून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणाची दक्षता खात्यामार्फत चौकशी करण्याची मागणी महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केली आहे.

मोन्‍सेरात यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना पत्र लिहिले आहे. निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या कंत्राटदारावर कारवाई झालीच पाहिजे. परंतु, काम योग्य दर्जाचे झाले असल्याची मान्यता देणाऱ्या अभियंत्यावर सुद्धा कारवाई होण्याची आवश्‍यकता आहे, असे मोन्सेरात यांनी स्पष्ट केले. पर्वरी येथील मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

हे प्रकरण गंभीर आहे, कारण केवळ एक किंवा दोन रस्त्यांवरील हॉटमिक्सिंग वाहून गेले नाही. तर, पणजी आणि ताळगाव परिसरातील प्रत्येक रस्त्याचे हेच हाल झाले आहेत. प्रचंड खर्च करून हे हॉटमिक्सिंग केले जाते.

त्यासाठी कित्येक वर्षांसाठी हॉटमिक्सिंग केलेला रस्ता टिकला पाहिजे. परंतु, येथे पाऊस सुरू झाल्यापासून हॉटमिक्सिंग चक्क वाहून गेले आहे. त्यासाठी चौकशी झाली पाहिजे, असे मत मोन्सेरात यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhurandhar 2 Collection: बॉक्स ऑफिसवर 'हमजा अली'चा धुमाकूळ! पहिल्याच दिवशी तोडला मोठा विक्रम; कलेक्शन 100 कोटी पार

Ahmed Shahzad slams PSL: "IPL च सरस!" 'पीएसएल'वर भडकला पाकिस्तानी स्टार खेळाडू; सांगितल्या 'या' 3 मोठ्या चुका

Xiaomi SU7 Series: 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 670 किमी धावणार, स्मार्टफोन कंपनीची 'सुपर कार' लॉन्च; जाणून घ्या फिचर्स

वाळपईत विकासाच्या गतीला अडथळे, मूलभूत समस्या कायम; वाहतूक कोंडीचा त्रास, पालिकेकडून ठोस कृतीची मागणी

पोर्तुगीज पासपोर्ट असला तरी मालमत्तेवर गदा नाही, ज्येष्ठ नागरिकावरील 'एफआयआर' रद्द

SCROLL FOR NEXT