Vasco  Dainik Gomantak
गोवा

Vasco News : विरियातोंचे संविधानविरोधी वक्तव्य : मंत्री माविन गुदिन्हो

Vasco News : भारतीय संरक्षण क्षेत्रातील व्यक्ती शिस्त पाळणारी असते, ही व्यक्ती शिस्त सोडाच संविधान न पाळणारी व्यक्ती आहे. यासाठी अशा व्यक्तीला मतदारांनी योग्य जागा दाखवावी, असे मत मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News :

वास्को, निवृत्त नौसैनिक असूनही भारतीय संविधानाच्या विरोधात बोलणे म्हणजे आपली मर्यादा ओलांडण्यासारखे आहे. ही व्यक्ती सदैव भारताच्या संविधानाच्या विरोधी वक्तव्य आहे.

भारतीय संरक्षण क्षेत्रातील व्यक्ती शिस्त पाळणारी असते, ही व्यक्ती शिस्त सोडाच संविधान न पाळणारी व्यक्ती आहे. यासाठी अशा व्यक्तीला मतदारांनी योग्य जागा दाखवावी, असे मत मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले.

कुठ्ठाळी - साकवाळ येथे २७ एप्रिल २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित बैठखीला पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो, आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर, राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडूलकर, केंद्रीय पदाधिकारी व साकवाळ, चिखली, बोगमाळोचे पंच सदस्य, मुरगाव पालिकेचे नगरसेवक, भाजपच्या कार्यकर्ते वास्को झेड स्क्वेर सभागृहात उपस्थित होते. यावेळी पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी वरील मत नोंदवले.

यावेळी सभेच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. साळकर म्हणाले, भारतीय संविधानाच्या विरोधात बोलणे म्हणजे कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी आपण भारतविरोधी असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे. काँग्रेस पक्ष संविधान विरोधात मोठे षडयंत्र रचित असून विरियातो यांनी राज्य घटनेविषयी मुद्दाम वक्तव्य केले आहे.

गोव्यातील स्वतंत्र सैनिकांचा कॅ. विरियातो यांनी अपमान केला असून त्याची जागा जनताच त्यांना दाखविणार आहे. विरियातो फर्नांडिस यांचा आमदार संकल्प आमोणकर यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले, साकवाळचे उपसरपंच गिरीश पिल्ले, साकवाळचे माजी सरपंच रमाकांत बोरकर यांनीही विचार व्यक्त केले.

जनतेची माफी मागा

भारतीय संविधान आमच्या देशाची लोकशाही टिकवून ठेवते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे आम्हाला थोर संविधान प्राप्त झाला आहे. त्या संविधानाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून दक्षिण गोवा काँग्रेस उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी मोठी चूक केली आहे, त्यांनी गोव्यातील स्वातंत्र्यसैनिक व जनतेची माफी मागावी, अशी मागणी चिखलीचे सरपंच कमला प्रसाद यादव यांनी केली आहे.

पोलिसांत तक्रार

मडगाव (खास प्रतिनिधी) : भारताचे संविधान गोव्‍यावर लादले, असे वक्‍तव्‍य करून काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय संविधानाचा अपमान केला आहे, असा आरोप करुन आज आमदार संकल्‍प आमोणकर यांनी कोलवा पोलिस स्‍थानकात कॅ. फर्नांडिस यांच्‍या विरोधात तक्रार नोंदविली.

विरियातोंच्‍या विरोधात कारवाई करण्‍याची मागणीही केली आहे. आज इंडियन टायगर्स असोसिएशन नामक युवक संघटनेने मडगाव उद्यानासमोर निदर्शने करुन कॅ. फर्नांडिस यांच्‍या विरोधात कारवाईची मागणी केली. यावेळी नेते शर्मंद रायतूरकर तसेच ॲड. अमोघ आर्लेकर हे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; संबंधितांवर कारवाई होणार, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

कोरोना व्हायरस करु शकतो कॅन्सरग्रस्त रुग्णांचा इलाज? नव्या अभ्यासाने डॉक्टरही चकित; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT