Goa News: कला अकादमीवरुन वादंग, IPL सट्टा यासह राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

Goa Live And Breaking 22 April 2024 News: राज्यभरात घडणाऱ्या क्रीडा, राजकारण, गुन्हे, कला, संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक घडामोडींचा आढावा.
IPL Betting
IPL Betting Dainik Gomantak

ताळगाव ग्रामपंचायत निवडणूक, पगारी सुट्टी जाहीर

ताळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकनिमित्ताने राज्य सरकारने 28 तारखेला पगारी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे पत्रक आज जारी करण्यात आले आहे.

पंजाब गुजरातच्या आयपीएल मॅचवर सट्टा; कांदोळीत गुजरातच्या नऊ जणांना अटक

IPL Betting

आयपीएलच्या सुरु असलेल्या पंजाब गुजरातच्या सामन्यावर कांदोळीत ऑनलाईन सट्टा घेतल्याप्रकरणी गुजरातच्या नऊ जणांना अटक. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लॅपटॉप, १७ मोबाईल असा एकूण चार लाखांचे मुद्देमाल जप्त केला.

IPL Betting
IPL Betting Dainik Gomantak

लोहिया मैदानावर सभेला परवानगी नाकारली

गोवा बचाव अभियानाच्या 25 एप्रिल रोजी लोहिया मैदानावर होणाऱ्या सभेला मडगाव नगरपालिकेचा नकार. नागरी तसेच विद्युत देखभालीचे कारण देत पालिकेने नाकारली परवानगी.

कला अकादमी फॉल्स सिलिंग प्रकरण, मुख्यमंत्री करणार चौकशी

कला अकादमीचे फॉल्स सिलिंग पडल्याच्या प्रकरणात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रकरणात स्वतः चौकशी करून माहिती घेणार असल्याचे सांगितले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची माहिती.

लाच प्रकरण! पोलीस हवालदार तळेकर, कळंगुटकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ

लाच प्रकरणात अटक झालेल्या पोलीस हवालदार संजय तळेकर आणि उदयराज कळंगुटकर यांच्या पोलीस कोठडीत अजून दोन दिवस वाढ करण्यात आली असून पुढील सुनावणी 24 तारखेला होईल.

तर या प्रकरणात अटक झालेले तत्कालीन पोलिस निरीक्षक विद्धेश पिळगावकर यांच्या जामिनावर उद्या (मंगळवारी) संध्याकाळी सत्र न्यायालयात सुनावणी होणार

91 सभागृह, 71 स्मशानभूमी, भाऊंनी दिले कामांचे रिपोर्ट कार्ड!

2014 ते 2024 या आपल्या 10 वर्षांच्या काळातील कामांचा आढावा श्रीपाद नाईकांनी ठेवला जनतेसमोर. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंच्या उपस्थितीत पुस्तीकेचे केले प्रकाशन. 91 सभागृहे, 71 स्मशानभूमी बांधल्याची दिली माहिती.

चार्ल्स कुरैया फाऊंडेशनामार्फत कला अकादमीचे ऑडीट करा!

सुमारे ७५ कोटी रुपये खर्चून दुरुस्त केलेल्या कला अकादमीचे चार्ल्स कुरैया फाऊंडेशनमार्फत ऑडीट करा. फॉल्स सिलिंग कोसळल्यानंतर गोवा फॉरवर्डच्या दुर्गादास कामत यांची पत्रकार परिषदेत मागणी‌.

Durgadas Kamat
Durgadas KamatDainik Gomantak

शिवोलीत कारचा अपघात

शिवोली येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट शेतात गेली. कार पर्यटक चालवत होते, अपघातानंतर ते घटनास्थळावरुन फरार झाले, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

Car Accident In Siolim
Car Accident In SiolimDainik Gomantak

पेडणे येथे ४.३५ लाखांचे मद्य जप्त, पाचजण अटकेत

पेडणे येथे ४.३५ लाखांचे १,३०५ लिटर मद्य जप्त करण्यात आले असून, पाचजणांना अटक करण्यात आली आहे. पेडणे पोलिसांनी ही कारवाई केलीय.

पुन्हा कोसळले कला अकादमीचे छत

Kala Academy Slab Collapsed
Kala Academy Slab CollapsedDainik Gomantak

Kala Academy Slab Collapsed

कला अकादमीच्या छताचा काही भाग सोमवारी सकाळी पुन्हा कोसळला. शनिवारी राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी झिरपून छत कमकुवत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचा काही भाग कोसळला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com