mormugao sada inflated electricity bills Dainik Gomantak
गोवा

मुरगाव, वास्कोत वीज बिलांचा शॉक! वाढीव बिलांमुळे संतप्त नागरिकांनी अभियंत्याला घेतलं फैलावर; विद्युत भवनात राडा

mormugao sada inflated electricity bills: राज्यात वाढीव विजेची बिले सर्वसामान्यांना येत असल्याने त्यांनी वीज विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. मुरगाव सडा परिसरात अनेकांना विजेची बिले वाढून आल्याने त्यांनी वास्को विद्युत भवनात जाऊन कार्यकारिणी अभियंत्याला जाब विचारला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: राज्यात वाढीव विजेची बिले सर्वसामान्यांना येत असल्याने त्यांनी वीज विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. मुरगाव सडा परिसरात अनेकांना विजेची बिले वाढून आल्याने त्यांनी वास्को विद्युत भवनात जाऊन कार्यकारिणी अभियंत्याला जाब विचारला. वीज बिलात कशी वाढ होते, यावर वीज अधिकाऱ्यांनी योग्य उत्तर दिले नसल्याने जाब विचारायला गेलेल्यांनी वीज प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

मुरगाव सडा परिसरात अनेक घरमालकांना वाढीव विजेची बिले आल्याने त्यांनी मुरगाव पालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष शांती मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली वास्को विद्युत भवनात जाऊन वाढीव बिलाविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला. गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात विजेचे वाढीव शुल्क आकारण्यात आल्याची माहिती शांती मांद्रेकर यांनी वास्को वीज विभागाचे कार्यकारिणी अभियंता गंगू कुट्टीकर यांना सांगितले. तसेच वाढीव शुल्क आमचे आम्हाला पुन्हा परत करण्याची मागणी केली.

मुरगाव सडा परिसराबरोबर वास्को-वाडे, नवेवाडे भागात दुप्पटीने विजेची बिले आल्याने अनेकांनी आपल्या विज बिलांसमवेत वास्को विद्युत कार्यालय गाठले, पण तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी तक्रारी घेऊन आलेल्यांना पहिल्या मजल्यावर जा, दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर जाण्यास सांगून ताटकळत ठेवले.

... तर वीजमंत्र्यांच्या घरी मोर्चा

जर विजेची बिले पुन्हा वाढीव पद्धतीने आल्यास वास्को (Vasco) विद्युत कार्यालयाबरोबर वीजमंत्र्यांच्या घरी मोर्चा घेऊन जाण्याचा इशारा माजी उपनगराध्यक्ष शांती मांद्रेकर यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. यावेळी उज्वला नार्वेकर, प्रतिमा मांद्रेकर उपस्थित होत्या.

योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन

माजी उपनगराध्यक्ष शांती मांद्रेकर यांनी कार्यकारिणी अभियंते गंगू कुट्टीकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना विजेच्या वाढीव शुल्काची माहिती दिली. त्यावर कुट्टीकर यांनी यावर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन तोडगा काढू, असे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT