

वास्को: एफ.एल. गोम्स मार्गावर सुरू असलेल्या भूगटार वाहिन्यांच्या कामामुळे वाहतुकीत वारंवार बदल करण्यात येत असून, योग्य नियोजनाअभावी वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिस तैनात नसल्याने वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले आहेत.
‘आयओसी’ चौक ते सेंट अँड्रयू चौकादरम्यान जुन्या व कमी व्यासाच्या भूगटार वाहिन्या बदलून नवीन मोठ्या वाहिन्या टाकण्याचे सुमारे ११ कोटी रुपयांचे काम सुरू आहे. जानेवारीपासून सुरू असलेल्या या कामामुळे एका बाजूची वाहतूक बंद करून दुसऱ्या अरुंद मार्गावर दुहेरी वाहतूक चालवली जात आहे.
वाहतुकीसाठी फक्त ट्रॅफिक कोन्स ठेवले जातात. मात्र, ते वारंवार हलल्याने किंवा पडल्याने वाहनचालकांची दिशाभूल होते. याशिवाय, आवश्यक सूचना फलक नसल्याने समस्या अधिकच गंभीर बनली आहे.
अपघाताचा धोका!
वेगमर्यादा न पाळणारे चालक आणि अरुंद रस्ता यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे येथे तातडीने वाहतूक पोलिस तैनात करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.