

Rahu Ketu Transit 25 November: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, छायाग्रह मानले जाणारे राहु आणि केतु हे नेहमी वक्री गतीने चालतात आणि त्यांच्या राशी बदलाचा थेट परिणाम सर्वच राशींच्या दैनंदिन जीवनावर, करिअरवर आणि नातेसंबंधांवर होतो. येत्या 25 नोव्हेंबर रोजी राहु मकर राशीत तर केतु कर्क राशीत प्रवेश करत आहे. या महत्त्वाच्या गोचरामुळे मेष, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या पाच राशींच्या आयुष्यात सकारात्मक वळण येण्याची चिन्हे आहेत. बदलत्या ग्रहांची ही स्थिती या राशींसाठी कोणकोणत्या संधी आणि आव्हाने घेऊन येत आहे.
मेष: या गोचराच्या काळात दीर्घकाळ रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मेहनत रंग आणेल आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा जबाबदारीचे मोठे पद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या अनुकूल काळात आईच्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष करु नका आणि नियमित काळजी घ्या.
मिथुन: आर्थिक आघाडीवर हा काळ दिलासादायक ठरु शकतो. अचानक धनलाभाचे योग जुळून आल्याने सांपत्तिक स्थिती अधिक भक्कम होऊ शकते. राहु आणि केतुच्या बदलत्या स्थितीचा फायदा घेत तुम्ही रखडलेले आर्थिक नियोजन पुन्हा नव्याने करु शकाल.
कर्क: केतुच्या प्रभावामुळे तुमचा कल अध्यात्म, चिंतन आणि मनःशांतीकडे अधिक राहील. दुसरीकडे, राहुचा प्रभाव वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनावर जाणवू शकतो. जोडीदारासोबत संवाद साधणे आणि एकत्र वेळ घालवणे या काळात अत्यंत गरजेचे ठरेल, जेणेकरुन घरगुती वातावरण सुसंवादी राहील.
सिंह: विरोधक आणि स्पर्धकांवर मात करण्यास हा काळ अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नियोजित उद्दिष्टे गाठण्यात यश मिळू शकेल. व्यावसायिकांसाठी नव्या संधी आणि उलाढाली वाढण्याचे संकेत आहेत.
कन्या: कामातील वेग आणि कार्यक्षमता सुधारल्याने दैनंदिन कामे अधिक सहज पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आणि परीक्षेत चांगली कामगिरी करणे सोपे जाईल. मात्र, वैयक्तिक आणि जवळच्या नात्यांमध्ये गैरसमज किंवा तणाव निर्माण होऊ शकतो; त्यामुळे बोलताना संयम आणि सावधगिरी बाळगा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.