Damodar Temple Dainik Gomantak
गोवा

Damodar Saptah: दामोदर सप्ताह फेरीत मांसाहारी पदार्थ, गोबी मंच्युरियन विकण्यास बंदी! परवाना रद्द, दंडात्मक कारवाईचा इशारा

Gobi Manchurian Ban: गतवर्षीही गोबी मंच्युरियन फेरीमध्ये विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यानंतर आलेल्या दबावानंतर ही बंदी सशर्त मागे घेण्यात आली होती.

Sameer Panditrao

Non-Veg Ban Goa: येथील प्रसिद्ध दामोदर सप्ताहाच्या फेरीत चिकन व इतर मांसाहारी पदार्थ तसेच गोबी मंच्युरियन विक्री करण्यास मुरगाव पालिकेने प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द करण्याचे तसेच दंड आकारण्याचे ठरले आहे.

बुधवारी झालेल्या पालिका मंडळाच्या खास बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत संशय आहे.

गत वर्षी सप्ताहात ऐनवेळी गोबी मंच्युरियन विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली होती. ३० जुलैला सप्ताहाला आरंभ होणार आहे. त्यानिमित्ताने मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत सप्ताहासंबंधी चर्चा करण्यात येऊन काही निर्णय घेण्यात आले आहेत.

यामध्ये फेरीमध्ये निरनिराळ्या पध्दतीचे चिकन तसेच मासांहारी पदार्थ विक्री करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर एखादा विक्रेता सदर पदार्थ विक्री करताना आढळला,तर त्याचा फेरीतील परवाना रद्द केला जाईलच शिवाय त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल. हा निर्णय फक्त फेरीत सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांसाठी लागू असणार आहे.

गतवर्षीही गोबी मंच्युरियन फेरीमध्ये विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यानंतर आलेल्या दबावानंतर ही बंदी सशर्त मागे घेण्यात आली होती.

गोबी मंच्युरियन विकताना ती दुकानात तयार करता येणार नाही, दुसरीकडे तयार करून विक्रीस मुभा दिली होती. त्या विक्रेत्यांना पालिकेने कोसंबी इमारतीतील दोन मोठ्या खोल्या दिल्या होत्या.

पालिका मंडळाने यंदा बंदी लागू केली असली, तरी या निर्णयाची अंमलबजावणी होईल की नाही ते लवकरच कळेल. दरम्यान, पालिकेच्या या निर्णयाचे बजरंग दल, गोवा विभाग प्रमुख नितीन फळदेसाई यांनी स्वागत केले आहे.

गर्दी टाळण्याचे आवाहन

शिरगाव येथील लईराईच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी जी दुर्घटना झाली, त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व देवस्थान मंडळांनी आवश्‍यक खबरदारी घ्यावी व असा प्रसंग पुन्हा होऊ नये, यासाठी उपाययोजना करावी. भाविकांनीही गर्दी टाळावी, असे आवाहन नितीन फळदेसाई यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT