Vasco: 3 जुलै रोजी वास्कोचा श्री दामोदर भजनी सप्ताह सोहळा

Vasco Damodar Bhajani Saptah: वास्को येथील श्री दामोदर भजनी सप्ताह (बाजारकर) उत्सव समितीचे अध्यक्षपदी श्री नरेंद्र गुरव यांची निवड करण्यात आली.

वास्को: वास्को येथील श्री दामोदर भजनी सप्ताह (बाजारकर) उत्सव समितीचे अध्यक्षपदी श्री नरेंद्र गुरव यांची निवड करण्यात आली तर सरचिटणीस म्हणून संतोष खोर्जुवेकर यांची नियुक्ती करण्यात आली. सदर आमसभेत ३० जुलै २०२५ रोजी साजरा होणाऱ्या श्री दामोदर भजनी सप्ताहात राज्य सरकारच्या नियमाचे पालन करणार असल्याची माहिती केंद्रीय समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांनी दिली.

मुरगावचे उपजिल्हाधिकारी व इतर सरकारी अधिकाऱ्या बरोबर संयुक्त बैठक घेऊन सर्व सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करणार असल्याचे सरचिटणीस संतोष खोर्जुवेकर यांनी सांगितले.

श्री दामोदर भजनी सप्ताह (बाजारकर) उत्सव समितीची आमसभा ८ जून २०२५ रोजी श्री दामोदर मंदिराच्या प्रांगणात, केंद्रीय समितीचे अध्यक्ष तथा उद्योजक प्रशांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली झाली. स्वागत उत्सव समितीचे अध्यक्ष तथा उद्योजक परेश जोशी यांनी केले. सरचिटणीस संतोष खोर्जुवेकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून त्याला सर्वांमते मान्यता घेतली. खजिनदार जितेंद्र शेट तानावडे यांनी जमाखर्च सादर केला त्याला उपस्थितांनी मान्यता दिली. सदर आमसभेत सदस्य चंद्रकांत गावस, आत्माराम नार्वेकर, प्रताप गावकर, प्रकाश गावस, बाबू गडेकर, तेजस पंडीत, सखाराम पार्सेकर, नीळकंठ देसाई, शेखर खडपकर, शैलेंद्र गोवेकर, दामू कोचरेकर, उमेश साळगावकर व इतर सभासदांनी आपले मत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

DA Hike January 2027
Goa Forward Panel Damodar College Election
Lenyadri Girijatmaj Temple History
Dhyan Foundation Goa Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com