Akshaya Naik guiding citizens in a program organized in the municipality
Akshaya Naik guiding citizens in a program organized in the municipality Gomantak Digital Team
गोवा

Valpoi : अल्पसंख्याकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा!

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई : जैन, पारशी, बौद्ध, शीख, ख्रिश्चन आणि मुस्लिम या अल्पसंख्याक समुदायांना सक्षम करण्यासाठी 2006 मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. सकारात्मक कृती आणि सर्वसमावेशक विकासाद्वारे अल्पसंख्याक समुदायांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणे हे याचे धोरण आहे.

जेणेकरून अल्पसंख्याक समुदायांना शिक्षण, रोजगार, आर्थिक व्यवहारांमध्ये समान वाटा मिळेल आणि त्यांची उन्नती साधण्यासाठी सक्रियपणे सहभागी होण्याची समान संधी मिळण्यासाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवातर्फे वाळपई नगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गोवा राज्य अल्पसंख्याक वित्त आणि विकास निगमच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी खास आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अक्षया नाईक यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष शेहजीन शेख, नगरसेवक शराफत खान, सय्यद सरफराज, विनोद हळदणकर, इसउद्दीन सय्यद, ओसली फर्नांडिस, केतन आरोसकर व इतरांची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने वाळपई नगरपालिका क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन ओसली फर्नांडिस यांनी केले.

‘शिष्यवृत्ती पोर्टल 2.0 ’

शिष्यवृत्ती योजनांत पारदर्शकता आणण्यासाठी, तसेच योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी 2016-17 दरम्यान शिष्यवृत्तींची माहिती देण्यासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयासह केंद्राच्या विविध मंत्रालयांकडून राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल 2.0 ची नवीन आणि सुधारित आवृत्ती तयार केली.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय अधिसूचित अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी तीन प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबवत आहे. (1) मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, (2) मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि (3) सुयोग्यता-उपजीविका (मेरिट-कम-मीन्स) यावर आधारित शिष्यवृत्ती असे त्यांचे प्रकार आहेत.

- अक्षया नाईक, मार्गदर्शक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

Delhi Excise Policy Case: दिल्ली कथित अबकारी धोरण घोटाळा; 'केजरीवाल', 'आप' आरोपी

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

SCROLL FOR NEXT