आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

Andhra Pradesh Adulterated Milk Deaths: आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली.
Andhra Pradesh Adulterated Milk Deaths
Andhra Pradesh Adulterated Milk DeathsDainik Gomantak
Published on
Updated on

Andhra Pradesh Adulterated Milk Deaths: आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली. गेल्या काही दिवसांत भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यामुळे तब्बल 13 लोकांचा मृत्यू झाला असून अद्याप 7 जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून दुग्धजन्य पदार्थांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी (12 मार्च) या भीषण घटनेची पुष्टी केली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाची सुरुवात 22 फेब्रुवारी रोजी झाली, जेव्हा लालाचेरुवु परिसरातील चौडेश्वरनगर आणि स्वरुपनगर येथील अनेक ज्येष्ठ नागरिकांना अचानक उलट्या, तीव्र पोटदुखी आणि लघवी थांबणे यांसारख्या गंभीर समस्या जाणवू लागल्या. बाधितांना तातडीने राजमहेंद्रवरम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला हा एखाद्या आजाराचा प्रादुर्भाव असावा असे वाटले होते, परंतु तपासाअंती एक धक्कादायक वास्तव समोर आले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांनी एकाच विक्रेत्याकडून दूध (Milk) खरेदी केले होते. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत असे सिद्ध झाले की, दुधातील भेसळ हेच या सर्व मृत्यूंचे मुख्य कारण आहे.

Andhra Pradesh Adulterated Milk Deaths
Andhra Pradesh Crime: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळले, ट्यूशनला जात असताना...

वैद्यकीय चाचण्यांदरम्यान रुग्णांच्या रक्तामध्ये युरिया आणि सीरम क्रिएटिनिनची पातळी अत्यंत उच्च असल्याचे आढळले. हे शरीरातील विषारी पदार्थांच्या प्रभावाचे स्पष्ट संकेत आहेत. प्राथमिक तपासणीनुसार, कोरुकोंडा मंडळातील नरसपुरम गावात असलेल्या 'वरलक्ष्मी मिल्क डेअरी'मधून हे विषारी दूध 106 कुटुंबांना पुरवले जात होते. या डेअरीतून घेतलेले दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून डेअरीला तात्काळ टाळे ठोकण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी 33 वर्षीय दूध विक्रेता अड्डाला गणेश्वरराव याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Andhra Pradesh Adulterated Milk Deaths
Andhra Pradesh: दक्षिणेत काँग्रेसला जोर का झटका! आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जिल्हा प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत बाधित भागात आपत्कालीन वैद्यकीय शिबिरे लावली आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची पथके घरोघरी जाऊन इतर कोणाला त्रास होत आहे का, याची तपासणी करत आहेत. ही घटना केवळ आंध्र प्रदेशापुरती (Andhra Pradesh) मर्यादित नसून संपूर्ण देशात भेसळयुक्त दुधाचे रॅकेट किती खोलवर रुजलेले आहे, याचे हे विदारक दर्शन आहे. दुधामध्ये युरिया, डिटर्जंट किंवा इतर रसायने मिसळल्यामुळे मानवी अवयवांवर, विशेषतः मूत्रपिंडावर गंभीर परिणाम होऊन मृत्यू ओढवू शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामागे मोठे टोळी सक्रिय आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com