Valpoi Electricity Issue: सत्तरी तालुक्यातील नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत.
काल मंगळवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री कोदाळ, माळोली, बांबर, धावे आदी भागातील युवकांनी वाळपई वीज कार्यालयावर धडक दिली व तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला.
त्यांनी शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही व अखेर रात्री एक-दीड वाजता नगरगाव कोदाळ रस्त्यावर आंब्याचे मळ भागातील बंच केबल दुरुस्ती करून आज बुधवारी पहाटे अडीच वाजता वीजपुरवठा सुरळीत करून घेतला.
बांबरचे अंकीत जोशी म्हणाले की, पूर्वी वीजतारांची सेवा चांगली होती. तीच सेवा पुन्हा सरकारने कार्यान्वित केली पाहिजे. बंच केबल अत्यंत कमी दर्जाची घातलेली असल्याने हे प्रकार होत आहेत. त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. अशी आधुनिक बंच केबल दुरुस्ती करणारे कुशल व्यक्ती स्थानिक पातळीवर तयार होणे गरजेचे आहे.
बंच केबल नादुरुस्त झाल्यानंतर तातडीने उपाय होईल तशी कार्यवाही आवश्यक आहे. पण नगरगाव भागात तशी स्थिती नाही. कोणालाही काहीच पडलेले नाही. लोकांनी उठाव केल्यानंतरच सरकारी यंत्रणा जागी होते. लोकांनी कडक भूमिका घेतल्यानंतर रात्री अडीच वाजता वीजपुरवठा सुरू झाला. पण समस्या अजून सुटलेली नाही.
बंच केबल सेवा मुळीच नको
युवकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. नगरगाव पंचायत भागात धावे, उस्ते, वरचावाडा धावे, बांबर, कोदाळ, साट्रे, देरोडे, माळोली आदी गावात वीज गुल झाली होती. वीज बंच केबलमध्ये वारंवारपणे होत असलेली समस्या त्यामुळे वीज गुल होण्याचे प्रकार नगरगाव पंचायत भागात वाढलेले आहेत. गेली दीड-दोन वर्षे हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे लोकांनी आता वीज बंच केबल सेवा नकोच अशीच भूमिका घेतलेली आहे.
बंच केबल अत्यंत कमी दर्जाची घातलेली असल्याने असे प्रकार होत आहेत. त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. अशी आधुनिक बंच केबल दुरुस्ती करणारे कुशल व्यक्ती स्थानिक पातळीवर तयार होणे गरजेचे आहे. बंच केबल नादुरुस्त झाल्यानंतर तातडीने उपाय होईल तशी कार्यवाही आवश्यक आहे.
- अंकीत जोशी, बांबर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.