No Firearms Training For Newly Recruited Police File Photo
गोवा

Valpoi Police Training School: नव्याने भरती झालेल्या पोलीस तुकडीला बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण नाही?

ही तुकडी 15 मार्चला वाळपई पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण सुरू करणाऱ्या 900 जणांपैकी एक आहे.

Kavya Powar

No Firearms Training For Newly Recruited Police

मागील काही महिन्यात गोव्यात बंदुकींच्या सहाय्याने घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र आता खुद्द पोलीस बंदूक वापरणार नसल्याचे समोर आले आहे. वास्तविक राज्यातील गुन्हे नियंत्रित करण्यासाठी पोलीस बंदूक वापरण्यात निष्णात असावेत, अशी अपेक्षा सामान्य नागरिक करू शकतात.

मात्र आश्चर्य म्हणजे नव्याने भरती झालेल्या पोलीस तुकडीला बंदूक वापरण्याचे कोणतेही व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येत नाही.

राज्यात सुरू होणाऱ्या नॅशनल गेम्सच्या तयारीसाठी सरकार आणि पोलीस सज्ज झाले आहेत. यासाठी नवीन पोलीस तुकडीला प्रशिक्षण सुरू आहे. सुमारे 374 कॉन्स्टेबल प्रशिक्षण घेत असून त्यांना गोळीबाराचे कोणतेही व्यावहारिक शिक्षण देण्यात येत नाही ही गंभीर बाब आहे.

ही तुकडी 15 मार्चला वाळपई पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण सुरू करणाऱ्या 900 जणांपैकी एक आहे. तर उर्वरितांना दिल्ली पोलीस प्रशिक्षण अकादमीमध्ये पाठवण्यात आले आहे.

माहितीनुसार एकूण कॉन्स्टेबल भरतीपैकी सुमारे 135 महिला कॉन्स्टेबल आहेत. त्या सर्वांना बंदुका हाताळण्याचे अनिवार्य प्रशिक्षण तसेच अगदी मूलभूत सरावाचा अभाव आहे.

गोवा पोलिसांनी सध्याच्या बॅचच्या कॉन्स्टेबलसाठी त्यांच्या शूटिंग रेंजमध्ये प्रवेश करण्यासाठी 3 मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंटला विनंती पाठवली होती. मात्र समोरून कोणताही प्रतिसाद आलेला नाही आणि विभागानेही या प्रकरणाचा पुढे पाठपुरावा केला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT