Sonsodo Garbage Plant: अखेर सोनसोडोची जैव-वैद्यकीय कचऱ्यापासून होणार सुटका; उच्च न्यायालयाचा आदेश

मागील काही महिन्यांपासून सोनसोडो कचरा प्लांटमध्ये असलेला जैव-वैद्यकीय कचरा समस्येचे कारण बनला होता.
Sonsodo Garbage Plant
Sonsodo Garbage PlantDainik Gomantak
Published on
Updated on

Sonsodo Garbage Plant: मागील काही महिन्यांपासून सोनसोडो कचरा प्लांटमध्ये असलेला जैव-वैद्यकीय कचरा समस्येचे कारण बनला होता. मात्र याबाबत आता चांगली बातमी समोर आली आहे. लवकरच सोनसोडोवरील जैव-वैद्यकीय कचरा हटवण्यात येणार आहे.

Sonsodo Garbage Plant
Goa Eco Sensitive Zone : जनजागृती करण्यात सरकार अपयशी दक्षिण गोव्‍यातील स्‍थिती

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोनसोडोवरील जैव-वैद्यकीय कचऱ्याचा ढिगारा अखेर लवकरच उचलला जाईल, असे सांगितले.

या जैव-वैद्यकीय कचऱ्यात सॅनिटरी डायपर आणि नॅपकिन्सचा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रचून गेल्या काही महिन्यांत सोनसोडोवर खच पडला होता. कचऱ्याने ढिगाऱ्याचे स्वरूप धारण केले आहे. याबाबत मडगाव नागरी संस्थेने कारवाई न केल्यामुळे सोनसोडो येथे जैव-वैद्यकीय कचरा वाढत असल्याचे बोलले जात आहे.

कुंडईत असलेल्या कंपनीने हा जैव-वैद्यकीय कचरा उचलण्यास नकार दिला होता, कारण मडगाव नगरपालिकेने अलीकडच्या काळात सॅनिटरी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे 30 लाख रुपयांची थकबाकी भरली नव्हती. मात्र नंतर ही समस्या न्यायालयाच्या निदर्शनास आली.

हा कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे यावर प्रकिया करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे असे न्यायालयाने सांगितले. आता लवकरच सोनसोडोची जैव-वैद्यकीय कचऱ्यापासून सुटका होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com