Utpal Parrikar Panaji voter list Nepali names Dainik Gomantak
गोवा

Nepali Voters: पणजीच्या मतदारयादीत नेपाळींची नावे घुसडण्याचे प्रयत्न! पर्रीकरांचे आरोप; केंद्र अधिकाऱ्यांना हटवण्यावरूनही शंका

Utpal Parrikar: उत्पल म्हणाले, आधार हे नागरिकत्व सिद्ध करत नाही. त्यामुळे निव्वळ आधारकार्डाची छायांकीत प्रत जोडून मतदार यादीत कोणाचेही नाव समाविष्ट करता येणार नाही.

Sameer Panditrao

पणजी : विधानसभा निवडणुकीला दोन वर्षे बाकी असतानाच उत्पल पर्रीकर यांनी दंड थोपटले आहेत. पणजी मतदारसंघाच्या मतदार यादीत नेपाळी नागरिकांची नावे समाविष्ट करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी त्यांनी केली आहे. मतदार यादीत कोणाची नावे समाविष्ट केली जातात, हे पाहण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांची फळी सक्रिय केली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराविरोधात लढताना पणजीच्या आमदाराला केवळ ६०० हून थोड्या अधिक मतांची आघाडी घेता आली. त्यामुळे घाबरून आता पणजीत मडगावच्या मोती डोंगरासारखी मतपेढी तयार करण्यात येत आहे. त्यासाठी मतदान केंद्र अधिकाऱ्यांना घाऊकपणे हटवण्यात आल्याचा आरोप उत्पल पर्रीकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, की एकाचवेळी २८ मतदान केंद्र अधिकाऱ्यांना हटविणे, ही सर्वसाधारण प्रशासकीय कृती नाही. विशेष करून, जेव्हा पणजीचा आमदारच त्या खात्याचा मंत्री असतो तेव्हा त्याकडे संशयानेच पाहिले पाहिजे. पुढील वर्षी पणजी महापालिकेची निवडणूक आहे. कर्तृत्वशून्यतेमुळे जनता आपल्याला नाकारेल, या भीतीपोटीच आता नेपाळींची नावे मतदार यादीत घुसडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

हटविलेल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी तसे करण्यास नकार दिल्याने आणि नागरिकत्वाच्या छाननीवर भर दिल्याने अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असतानाही त्यांना हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी राजकीय कृतज्ञतेच्या छायेत असलेल्या नव्याने नोकरीत रूजू झालेल्यांना नेमले आहे. ते मंत्र्याचा दबाव सहन करू शकणार नाहीत आणि नेपाळींची नावे समाविष्ट केली जातील, असे ते म्हणाले.

उत्पल म्हणाले, आधार हे नागरिकत्व सिद्ध करत नाही. त्यामुळे निव्वळ आधारकार्डाची छायांकीत प्रत जोडून मतदार यादीत कोणाचेही नाव समाविष्ट करता येणार नाही. याविरोधात आधी तालुक्याच्या मामलेदारांना आणि नंतर आवश्यकता भासल्यास राज्य निवडणूक आयुक्तांना निवेदन दिले जाईल. या प्रकरणी न्यायालयीन लढ्याचीही तयारी आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ३० नावे वाढवून पणजीवासीयांची मते नगण्य ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT