Utpal Parrikar: 'तिकीट कापले म्हणून नव्हता सोडला पक्ष', मनोहर पर्रीकरांचा पुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार?

Goa BJP Politics: नव्याने नियुक्त प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासोबत पहिल्यापासूनच उत्तम संबंध आहेत, असे मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल पर्रीकर म्हणाले आहेत.
Is Utpal Parrikar To Join BJP Soon?
Utpal ParrikarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर भाजपमध्ये प्रवेश करणार का? याबाबत त्यांनी स्वत:च भाष्य केले आहे. नवे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी अपेक्षेप्रमाणे काम केल्यास त्यांचे आणि माझे विचार व मते जुळतील, असे उत्पल पर्रीकर म्हणाले आहेत. तसेच तिकीट कापले म्हणून पक्ष सोडला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उत्पल पर्रीकर यांनी एका खासगी युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी उत्पल यांनी भाजप प्रवेशाबाबत देखील भूमिका स्पष्ट केली. 'नव्याने नियुक्त प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासोबत पहिल्यापासूनच उत्तम संबंध आहेत. हे संबंध राजकारणापलिकडचे आहेत. त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मी त्यांच्याकडे केव्हाही जाऊन बोलू शकतो, माझे मत व्यक्त करु शकतो. पण, सध्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची कोणत्याही चर्चा सुरु नाही', असे उत्पल पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

Is Utpal Parrikar To Join BJP Soon?
Mumbai Goa Highway Accident: ट्रीपनंतर रेस्टॉरंट शोधत असताना मुंबई गोवा महामार्गावर अपघात; 28 वर्षीय तरुणी ठार, दोघे जखमी

'मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी मला तिकीट नाकारण्यात आले याचे कारण माझे बाबा आणि माझ्यावर काही नेत्यांचा राग होता, असा खुलासा उत्पल यांनी या मुलाखतीत केला. नव्या प्रदेशाध्यक्षांनी अपेक्षेनुसार काम केल्यास आमची मते जुळतील, असेही उत्पल म्हणाले. तिकीट नाकारल्यामुळे मी पक्ष सोडला नाही. त्यावेळी ८० टक्के केडर माझ्यासोबत होते, असे मला एका वरिष्ठ नेत्यांने मला सांगितले होते', असेही पर्रीकर या मुलाखतीत म्हणाले.

बाबुश यांचे राजकारण मला आवडत नाही, असे उत्पल म्हणाले. स्मार्ट सिटीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे मी यापूर्वीच बोललो होतो. राज्य सरकारसह पणजीचा लोकप्रतिनिधी म्हणून बाबुश देखील याला जबाबदार असल्याचे मत उत्पल यांनी यावेळी व्यक्त केले. स्मार्ट सिटी पणजीचे काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सरकारने यात काळजीपूर्वक लक्ष घालण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच, पणजी पालिकेतही नेतृत्वात बदल व्हायला हवा, असे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com