Babush Monserrate:"हावेन ही झाडा रोयल्यात?" स्मार्ट सिटी पणजीतील गांजा प्रकरणावरुन प्रश्न विचारताच मंत्री बाबूश यांचा पारा चढला

Panaji Goa News: पणजीचे आमदार आणि गोव्याचे कामगार आणि रोजगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी माध्यमांना दिलेलं उत्तर सध्या प्रचंड व्हायरल होतंय
Panaji Goa News| Babush Monserrate | MLA Panaji
Babush MonserrateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: स्मार्टसिटीच्या आवारात अचानक एक गांजाचं झाड सापडल्याने सगळीकडेच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. सर्वात आधी काही दिवसांपूर्वी काकुलो मॉल आणि त्यानंतर सांतिनेज परिसरात गांजाचं रोप आढळून आल्याने अनेकांच्या मनात याबद्दल प्रश्न निर्माण झाला होता. स्मार्टसिटीमध्ये गांजाचं झाड नेमकं आलं तरी कुठून याच अद्याप उत्तर मिळालेलं नाही, मात्र पणजीचे आमदार आणि गोव्याचे कामगार आणि रोजगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी माध्यमांना दिलेलं उत्तर सध्या प्रचंड व्हायरल होतंय.

पत्रकारांनी पणजीचे आमदार बाबूश यांना पणजीत सलग दोनवेळा घडलेल्या या विचित्र प्रकाराबद्दल प्रश्न विचारल्यानांतर बाबूश म्हणाले की , "मी ती झाडं लावली आहेत का?, ती झाडं कोणी लावली हे शोधून काढा.मीच अशा प्रकारांना प्रोत्साहन देत असल्याप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारात आहात." पणजीचे आमदार असून देखील बाबूश मोन्सेरात यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते सध्या बऱ्याच चर्चेत आहेत.

पणजीत एकूण प्रकार काय?

काही दिवसांपूर्वी काकुलो मॉल, पणजीच्या परिसरात एक धक्कादायक घटना घडली होती. स्मार्ट सिटीमध्ये रस्त्याच्या कडेला अचानक एक गांजाचं रोप सापडल्याने सगळीकडेच खळबळ उठली होती.

Panaji Goa News| Babush Monserrate | MLA Panaji
Panaji Goa: गोव्यात चाललंय काय? स्मार्ट सिटी पणजीत पुन्हा सापडले गांजाचे झाड

अमलीपदार्थ विरोधी पथकाने पूर्ण तपास करून ते रोप गांजाचंच असल्याचं स्पष्ट केलं होतं आणि त्यांनतर काही दिवसांतच पुन्हा एकदा पणजी शहरात हीच घटना घडली आणि यावेळी सांतिनेज परिसरात गांजाचं रोप आढळून आलं.

गांजाची ही छोटी-छोटी रोपं पाहिली म्हणजे या रोपांच्या बिया नेमकं कोण आणून टाकतंय किंवा कधीपासून आणून टाकतंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. गोव्याची राजधानी असलेल्या पणजी स्मार्ट सिटीतील शीतल हॉटेल ते मधुबन जंक्शन रस्त्याजवळ आणि मॉलच्या परिसरात गांजाची रोपं आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com