Wildlife Conflict Usgao Canva
गोवा

Usgao Leopard: उसगावात बिबट्याचा संचार, हा घ्या पुरावा, वनविभाग अलर्ट मोडवर

Usgao Latest News: तिराळ येथे गेल्या २-३ दिवसापासून बिबट्याचा संचार सुरू आहे. दुपारच्या वेळी बिबट्या लोकवस्तीतील कुत्र्यांची शिकार करीत आहे.

Sameer Panditrao

Leopard Bison Sighting In Goa Usgao

फोंडा: तिराळ-उसगाव येथे ४-५ दिवसापूर्वी अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याची स्कूटरला धडक बसून आई व मुलगा जखमी होण्याची घटना घडली होती. जखमी रामिता रमेश नाईक व आदेश रमेश नाईक याच्यावर इस्पितळात उपचार केल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहेत.

तिराळ येथे गेल्या २-३ दिवसापासून बिबट्याचा संचार सुरू आहे. दुपारच्या वेळी बिबट्या लोकवस्तीतील कुत्र्यांची शिकार करीत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसापूर्वी बिबट्या उसगाव येथील हायस्कूल जवळील रस्त्यावर बसलेल्या स्थितीत आढळून येत होता.

बिबट्या पालवाडा व टाकवाडा परिसरातून येत आहे. सध्या बिबट्याला तिराळ भागात कुत्र्यांची शिकार मिळत असल्याने त्याच ठिकाणी त्याने ठाण मांडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

सध्या वन खात्याने गस्त घालण्यास सुरुवात केली असून ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

साखळीतील किल्ल्याचं काम पूर्णत्वास, फेब्रुवारीच्या अखेरीस उद्घाटन; CM प्रमोद सावंतांची माहिती

Rohit Sharma: "अजीब लग रहा है इधर..." वानखेडेवर टीम इंडियाचा ड्रेसिंग रूम पाहून 'मुंबईचा राजा' भावूक Watch Video

मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपले सिंहासन सोडले होते आणि भद्रबाहूसोबत श्रवणबेळगोळच्या टेकडीवर गेला; भगवान गोमटेश्वराचा शिलालेख

Salt Pan Preserve: गोव्याच्या 'मिठागरांना' नवसंजीवनी! राज्य सरकारकडून 95 लाखांची तरतूद, 75 शेतकर्‍यांना मिळणार थेट लाभ

कोकणातल्या चाकरमान्यांना 'लालपरी'चा आधार; 'शिमगोत्सवासा'ठी मुंबई–कोकण मार्गावर जादा गाड्या धावणार, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT