Leopard Attack: चिंता वाढली! बिबट्याने पाडला वासराचा फडशा; वनखात्याच्या पिंजऱ्याला हुलकावणी

Arambol Leopard Attack: गेला महिनाभर या भागात बिबट्याची दहशत सुरू असून तीन चार वेळा लोकांना या बिबट्याचे दर्शन घडले असून एका कुत्र्यास चावा घेऊन जखमी केल्याची यापूर्वी घटना घडली आहे.
Leopard Attack
Leopard Attack Canva
Published on
Updated on

Leopard In Arambol

हरमल: वन विभागाने पिंजरा लावला असतानाही नानोस्करवाडा भागात बिबट्याची दहशत वाढत चालली असून गुरुवारी पहाटे वरचावाडा येथील देवानंद नाईक यांच्या गोठ्यात बांधलेल्या एका वासराचा बिबट्याने फडशा पाडला.

गेला महिनाभर या भागात बिबट्याची दहशत सुरू असून तीन चार वेळा लोकांना या बिबट्याचे दर्शन घडले असून एका कुत्र्यास चावा घेऊन जखमी केल्याची यापूर्वी घटना घडली आहे. दरम्यान, ७ रोजी रात्री २ च्या सुमारास अंगणात फिरणारा बिबटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर घरमालक सागर नानोस्कर यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली.

Leopard Attack
Tiger Attack: ..अचानक समोर आला वाघ! हल्ला करणार इतक्यात; चोर्ला घाटातील थरारक प्रसंग वाचा

त्यानंतर वन विभागाने ८ रोजी या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. मात्र बिबटा या भागात न फिरता वरचावाडा भागात एका गोठ्यात बांधलेल्या वासराचा फडशा पाडून गेल्याने लोकांची चिंता वाढली आहे.

Leopard Attack
Leopard In Bordem: बोर्डेत बछड्यासह दिसलेला बिबट्या तोच आहे की..? आधीच भीती त्यात संभ्रम

कुत्र्याचा मालक चिंतेत

वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी सागर नानोस्कर यांच्या घराशेजारी पिंजरा ठेवला आहे. मात्र या पिंजऱ्यात सावज म्हणून बांधून ठेवण्यासाठी कुत्र्याची सोय वन विभागाने केली नाही, उलट नानोस्कर यांनाच कुत्र्याची सोय करण्यास सांगितले. त्यामुळे नानोस्कर यांना आपल्या घरातील पाळीव कुत्र्याला पिंजऱ्यात बांधून ठेवणे भाग पडले आहे. पिंजऱ्यात बिबटा जेरबंद झाला तरी आपल्या कुत्र्याचे प्राण जाईल, याची चिंता सध्या नानोस्कर यांना सतावत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com